नंदुरबार – जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर कोंडाईबारी घाटात ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपातील मेंढ्यांना चिरडले. यात अनुमाने १०० हून अधिक मेंढ्या ठार झाल्या आहेत. महामार्गावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. मेंढपाळाची लाखो रुपयांची हानी झाली आहे. मेंढीचे मालक लखा गोविंदा गोईकर आणि बाळू सोमा गोईकर, दगडू गोईकर (रा. विजापूर ता. साक्री जिल्हा धुळे) हे ७०० मेंढ्याचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जात होते. त्या वेळी ही घटना घडली.
पोलिसांनी ट्रक चालकास कह्यात घेतले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मेंढपाळाने आरोपी ट्रक चालकावर कठोर कारवाई करत हानीभरपाई मिळण्याची मागणी केली आहे.