आरक्षण नसलेल्या समाजातील व्यक्तीशी विवाह केल्याने किंवा धर्मांतर केल्याने आरक्षणाचे लाभ समाप्त होत नाहीत ! – केरळ उच्च न्यायालय

जर कोणत्याही आरक्षण घेत नसलेल्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतल असलेल्या व्यक्तीला दत्तक घेतले, तरीही संबंधित दत्तक घेतलेली व्यक्ती आरक्षणाचा लाभ घेऊ शकते, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

‘पी.एफ्.आय.’च्या जिहादी कार्यकर्त्यांना अग्निशमन प्रशिक्षण दिल्याने केरळचे २ पोलीस अधिकारी निलंबित !

जिहादी संघटना ‘पी.एफ्.आय.’च्या (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या) कार्यकर्त्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या प्रकरणी केरळच्या दोन पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले.

गरोदर बकरीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक !

एका मुक्या प्राण्यावर अशाप्रकारे अत्याचार करणे, यातून मानवाची किती पराकोटीची अधोगती झाली आहे, हे लक्षात येते ! अशा प्रातिनिधिक घटनांतून समाजपुरुषाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्वही पुन्हा एकदा अधोरेखित होते !

केरळमध्ये स्वतःचा कोणताच धर्म नसल्याचे लिहून दिल्यामुळे जन्मतः मुसलमान नृत्यांगनेला मंदिरात भरतनाट्यम् नृत्य सादर करण्यास नकार !

राज्यातील कूडलमणिक्यम् मंदिरात पूजा करण्यासाठी किंवा कार्यक्रम सादर करण्यासाठी हिंदु असणे अपरिहार्य !

गोमांस कढी न मिळाल्याच्या रागातून ख्रिस्ती तरुणाने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू, २ जण घायाळ !

मार्टिन हातगाडीवर जेवणासाठी गेला होता. तेथे त्याच्या आवडीची गोमांस कढी संपल्याचे त्याला समजल्यावर त्याने हातगाडीच्या मालकीणीला शिवीगाळ केली. विरोध केल्यानंतर मार्टिन निघून गेला आणि त्याने पिस्तुल आणून गोळीबार केला.

हिंदुत्वनिष्ठ नेत्या के.पी. शशिकला यांच्यावरील आरोप केरळ उच्च न्यायालयाकडून रहित !

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप के.पी. शशिकला यांच्यावर करण्यात आला होता.

(म्हणे) ‘राष्ट्रवादी होण्यासाठी हिंदू असणे आवश्यक ठरवले जात आहे !’

चित्रपट दिग्दर्शक अनुराग्य कश्यप यांचे हिंदुद्वेषी विधान !
कश्यप यांच्यासारखे जन्महिंदू जाणीवपूर्वक राष्ट्रवादी हिंदूंची अपकीर्ती करण्यासाठी अशी विधाने करत आहेत, हे लक्षात घ्या !

पठानमथिट्टा (केरळ) येथे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्राला अटक

अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत आणि प्रसारमाध्यमे अशी वृत्ते दडपतात, हे लक्षात घ्या !

मुसलमान महिलांना घरातच बंद ठेवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

न्यायालयाचा निर्णय मुसलमानांच्या बाजूने लागला असता, तर त्यांनी कर्नाटक शासनाला धारेवर धरले असते. न्यायालयाने वस्तूस्थितीचा अभ्यास करून दिलेला निर्णय नाकारून मुसलमान संघटना भारतीय राज्यघटनेचा अवमान करत आहेत.

जनताद्रोही कायदा करून जनतेची लूट करणार्‍या साम्यवादी केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !

मंत्र्यांनी नियुक्त केलेल्या खासगी कर्मचार्‍यांना आजन्म निवृत्तीवेतन दिले जात असल्याचे प्रकरण
आजन्म निवृत्तीवेतन देण्याचा कायदा केवळ केरळ राज्यातच!