थिरूवनंतपूरम् (केरळ) – एका १३ वर्षीय मुलीवर अनेक वेळा बलात्कार करणार्या जोस प्रकाश नावाच्या ख्रिस्ती पाद्र्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. राज्यातील मंजेरी येथील ‘पॉक्सो’ न्यायालयाने या शिक्षेसमवेतच या ५१ वर्षीय पाद्र्याने पीडितेला अडीच लाख रुपये हानीभरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. ख्रिस्ती धर्मातील ‘पेन्टेकोस्टल’ पंथाचा हा पाद्री थिरूवनंतपूरम्जवळ असलेल्या बलरामपूरम् येथील आहे.
१. बलात्काराच्या घटना वर्ष २०१६ मधील असून पाद्री मल्लपूरम् येथे एका ख्रिस्ती कार्यक्रमासाठी गेला होता. ेथे आलेल्या पीडितेच्या पालकांना त्याने सांगितले, ‘तुमच्या मुलांना वाईट शक्तींनी पछाडले आहे. त्यांच्यासाठी ‘विशेष प्रार्थना’ करण्याची आवश्यकता आहे’.
२. हे ऐकून घाबरलेल्या पालकांनी पाद्र्याला घरी आमंत्रित केले. पाद्र्याने त्यांच्या मुलीला शयनकक्षात नेऊन तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. मुलीने तोंड उघडू नये, म्हणून पाद्र्याने तिला ‘तोंड उघडल्यास देवाचा राग ओढवून घेशील’, असे सांगून धमकावले होते.
३. एके दिवशी पीडितेच्या आईला संशय आला. तिने मुलीला यावर प्रश्न विचारले असता पीडितेने तिच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला.
४. पालकांनी या घटनेची पोलिसात तक्रार केल्यानंतर पाद्र्याला अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिकाजर एखाद्या साधूवर असे खोटे आरोप जरी झाले असते, तर एव्हाना निधर्मीवाद्यांनी हिंदु धर्मावरच चिखलफेक करण्यास आरंभ केला असता ! प्रसारमाध्यमांनी आकाशपाताळ एक करून हिंदु संतांवर टीका केली असती ! आता शिक्षा करण्यात आलेला ख्रिस्ती पाद्री असल्याने सर्वत्र शांतता आहे. |