थिरूवनंतपूरम् – वर्ष १९२१ मध्ये मलबारमध्ये झालेला मोपला नरसंहार हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक गौरवशाली अध्याय होता, अशी हिंदुविरोधी घोषणा केरळ विधानसभेचे सभापती तथा माकपचे नेते एम्.बी. राजेश यांनी २२ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या एकाही सदस्याने त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात बोलण्याचे धाडस दाखवले नाही. ‘राजेश यांनी मोपला नरसंहाराविषयी बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी क्रांतीवीर भगतसिंग यांचा अवमान केल्याविषयी राजेश यांच्या विरोधात देहली पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. त्यांनी भगतसिंग यांची तुलना वरियान कुन्नाथू कुंजाहम्मद हाजी नावाच्या जिहाद्याशी करून त्यांचा अवमान केला होता. हाजी याने वर्ष १९२१ च्या हिंदू नरसंहाराचे नेतृत्व केल्याचे अनेक जण मानतात’, असे युवा मोर्चाच्या नेत्यांनी सांगितले.
Kerala Speaker glorifies the 1921 Malabar Moplah genocide on the floor https://t.co/CNyXbTDI2T
— HinduPost (@hindupost) August 26, 2022
मोपला दंगल काय आहे ?
सप्टेंबर १९२१ मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात मुसलमानांनी बंड पुकारले, असा खोटा इतिहास सांगण्यात येतो. वास्तवात या काळात मुसलमानांची हिंदूंवर अनन्वित अत्याचार करून त्यांची हत्या केली. या दंगलीत १० सहस्र हिंदूंची हत्या केल्याचे, तसेच लाखो हिंदूंनी तेथून पळ काढल्याचे सांगण्यात येते.
संपादकीय भूमिकाअसे म्हणून हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणारे केरळ विधानसभेचे हिंदुविरोधी सभापती. साम्यवादी सत्तेत असलेल्या केरळच्या सभापतींकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ? |