मुला-मुलींना वर्गात एकत्र बसवल्याने अराजकता निर्माण होते ! – केरळचे हिंदुत्वनिष्ठ नेते वेल्लापेल्ली नटेसन्

केरळचे हिंदुत्वनिष्ठ नेते वेल्लापेल्ली नटेसन्

कोची (केरळ) – केरळच्या साम्यवादी सरकारने मुले आणि मुली असे दोघांनाही एकच गणवेश आणि वर्गांत एकत्र बसवणे यांविषयी बनवलेले धोरण पूर्णपणे अन्यायकारक आहे. मुला-मुलींना वर्गात एकत्र बसवणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे आणि यामुळे अराजकता निर्माण होते, असे वक्तव्य केरळच्या ‘हिंदु एझावा समुदा’याचे नेते वेल्लापेल्ली नटेसन् यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले. ते म्हणाले, ‘‘आपली स्वत:ची संस्कृती आहे. आपण अमेरिका किंवा इंग्लंड येथे रहात नाही. आपली संस्कृती मुला-मुलींना मिठी मारणे आणि एकत्र बसणे स्वीकारत नाही. ख्रिस्ती आणि मुसलमान शैक्षणिक संस्थांमध्ये हे होतांना दिसत नाही. ’’

श्री. नटेसन पुढे म्हणाले की, बहुतेक हिंदु महाविद्यालयांमध्ये अशी व्यवस्था पहायला मिळते. स्वत:ला धर्मनिरपेक्ष सरकार म्हणवणारे साम्यवादी सरकार धार्मिक दबावाला बळी पडत आहे आणि आपल्या निर्णयांवर ठाम रहात नाही, हे दुर्दैवी आहे.