केरळमधील माकपच्या सरकारमधील हज मंत्री सरकारी पैशांतून अमेरिकेत घेणार उपचार !

स्वतःच्या वैद्यकीय उपचारांसाठी जनतेच्या करातून पैसे खर्च करणार्‍या मंत्र्यांना निवडून देणार्‍या केरळमधील जनतेला ही शिक्षाच होत !

केरळमध्ये भाजप नेते रंजीत श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी एस्.डी.पी.आय.च्या ५ कार्यकर्त्यांना अटक

भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजीत श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्‍या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.च्या) ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्राला विरोध करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली

भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असते. या छायाचित्राविषयी आक्षेप घेणारी एक याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळत याचिकाकर्त्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

केरळमध्ये धर्मांध सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍याच्या हत्येच्या प्रकरणी रा.स्व. संघाच्या दोघांना अटक !

शान यांच्या हत्येचा सूड म्हणून भाजपचे ओबीसी मोर्चाचे रंजित श्रीनिवास यांच्या करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणी मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही !

हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

साम्यवाद्यांचे सरकार असलेल्या केरळ राज्यात धर्मांधांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली न जाणे, यात आश्‍चर्य ते काय ?

अलप्पुळा (केरळ) येथे १२ घंट्यांत भाजप आणि एस्.डी.पी.आय. यांच्या नेत्यांची हत्या

अलप्पुळा १८ डिसेंबरच्या रात्री जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्‍या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे (‘एस्.डी.पी.आय.’चे) राज्य सचिव के.एस्. शान या नेत्याची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली.

केरळमध्ये ‘ईडी’कडून पी.एफ्.आय.च्या ४ ठिकाणांवर धाडी

या धाडीतून आक्षेपार्ह कागदपत्रे, यंत्रे आणि विदेशांत असलेल्या संपत्तीविषयीची माहिती मिळाली आहे. देशात पी.एफ्.आय.विरुद्ध दंगली भडकावणे, आतंकवाद्यांशी संबंध आदी गुन्हे नोंद आहेत.

केरळमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारणार !

धर्मांधांकडून सामाजिक माध्यमांद्वारे सीडीएस् बिपीन रावत यांच्या मृत्यूचा मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केल्याचा परिणाम !

केरळमध्ये ६ डिसेंबरला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांकडून कॉन्व्हेंट शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘मी बाबरी आहे’ असे लिहिलेल्या बिल्ल्यांचे वाटप !

पोलिसांकडून गुन्हा नोंद !

शाळेच्या स्वच्छतागृहात छुपे छायाचित्रक (कॅमेरा) लावणार्‍या धर्मांध शिक्षकाला अटक

असे वासनांध, ‘शिक्षक’ म्हणवण्याच्या पात्रतेचे आहेत का ? सरकारने अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !