मुसलमान मुलींच्या इतर धर्मातील मुलांशी लग्नाला केरळ सरकारचे प्रोत्साहन ! – मौलाना नासर फैजी यांचा आरोप

मौलाना नासर फैजी

कोझीकोड (केरळ) – ‘केरळ जम-आयतुल उलामा’ या संघटनेच्या सुन्नी युवाजन सभेचे सचिव मौलाना नासर फैजी यांनी नुकतेच कोझीकोडमध्ये बोलतांना केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार मुसलमान मुलींच्या इतर धर्मातील मुलांशी लग्नाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे. मौलाना नासर पुढे म्हणाले, ‘‘मुसलमान मुलींचे अपहरण करून त्यांचे मुसलमानेतर मुलांशी लग्न लावले जात आहे.

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डावपेचांपासून मुसलमान समाजाने सावध रहावे. राज्यघटनेने मुसलमानांना मुसलमानाशी आणि हिंदूंना हिंदूंशी विवाह करण्याचा अधिकार दिला आहे; पण काही मूर्खांना वाटते की, हिंदु-मुसलमान विवाह केल्यास भारतीय संस्कृतीचा प्रसार होईल.’’

संपादकीय भूमिका 

धर्मांध मुसलमानांच्या लव्ह जिहादवरून समाजाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा हा खटाटोप आहे, हे कुणीही सांगेल !