भाजपचे प्रवक्‍ते माधव भंडारी यांचा ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त सत्‍कार

श्री. माधव भंडारी (उजवीकडे) यांचा सत्‍कार करतांना श्री. सुनील घनवट

विद्याधिराज सभागृह – भाजपचे महाराष्‍ट्र राज्‍य प्रवक्‍ते श्री. माधव भंडारी यांनी २८ जून या दिवशी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या स्‍थळी भेट दिली. त्‍यानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्‍यांंचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्‍तू देऊन सत्‍कार केला.

सत्‍काराला उत्तर देतांना श्री. भंडारी म्‍हणाले, ‘‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदुत्‍वनिष्‍ठ उपस्‍थित असून ते हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेविषयी चिंतन करत आहेत. हे पाहून आनंद झाला. आपण सर्व जण यात प्रगती कराल, यात शंका नाही.’’