वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस (२८ जून) : मंदिर संस्‍कृतीचे पूनर्जीवन

मंदिरातून हिंदूंना धर्मशिक्षण मिळाले पाहिजे ! – पू. प्रा. पवन सिन्‍हा गुरुजी, संस्‍थापक, पावन चिंतन धारा आश्रम, गाझियाबाद, उत्तरप्रदेश

पू. प्रा. पवन सिन्‍हा गुरुजी

विद्याधिराज सभागृह – मंदिरातील पुरोहितांचा धर्म केवळ लोकांना टिळा लावण्‍यापुरता मर्यादित नाही. त्‍यांनी हिंदूंना धर्माचे शिक्षण देणेही अपेक्षित आहे. त्‍यातून हिंदूंचा धर्माभिमान वाढून त्‍यांचे मनोबल वाढेल आणि सर्व संघटित होतील. सध्‍याच्‍या काळात हिंदु धर्माविषयी निधर्मीवाद्यांकडून अपप्रचार केला जातो. तो अपप्रचार खोडून काढण्‍यासाठी पुरोहितांकडून शास्‍त्राचे प्रामाणिक ज्ञान मिळणे आवश्‍यक आहे, असे मार्गदर्शन पावन चिंतन धारा आश्रमचे संस्‍थापक पू. प्रा. पवन सिन्‍हा गुरुजी यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या पाचव्‍या दिवशी केले. ते ‘मंदिर संस्‍कृतीच्‍या पुनरुज्‍जीवनासाठी आवश्‍यक प्रयत्न’ या विषयावर बोलत होते.

मंदिरांची स्‍वच्‍छता करणे आवश्‍यक

पू. पवन सिन्‍हा गुरुजी म्‍हणाले, ‘‘मंदिरांचे वैभव नष्‍ट होऊ नये; म्‍हणून प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. मंदिरांमुळे भक्‍ताच्‍या जीवनात परिर्वतन होते. तेथे जातांना काही नियम असले पाहिजेत. आपण मंदिरात जाऊन पापाचे गाठोडे आणि अपेक्षा सोडून येतो. सध्‍या हिंदू तेथे गेल्‍यावर अस्‍वच्‍छताही सोडून येतात. मंदिरात स्‍वच्‍छतेची सेवा केल्‍याविना व्‍यक्‍तीच्‍या चेतनेचे उत्‍थान होऊ शकत नाही. त्‍यामुळे आपण स्‍वत:हून मंदिराची स्‍वच्‍छता केली पाहिजे.’’

सुव्‍यस्‍थापन असलेल्‍या आश्रमांची निर्मिती होणेही आवश्‍यक !

मंदिरासह आश्रम व्‍यवस्‍थेलाही समवेत घेऊन चालले पाहिजे. आश्रमव्‍यवस्‍थेत विचारांना परिवक्‍व केले जाते. तेथे व्‍यष्‍टी आणि समष्‍टी यांचे मिलन होते. आश्रमात कच्च्या मातीला आकार देऊन पक्‍के मडके घडवले जाते. तेथे आध्‍यात्मिक उन्‍नती आणि शिक्षण प्राप्‍त करू शकतो. जेव्‍हा समाजात हाहाकार माजला होता, तेव्‍हा आचार्य आणि संतजन यांनी लोकांचे मनोबल टिकवून ठेवले होते. आज तिच स्‍थिती निर्माण झाली आहे. त्‍यामुळे सुव्‍यस्‍थापन असलेल्‍या आश्रमांची निर्मिती आवश्‍यक आहे, असेही मार्गदर्शन पू. प्रा. पवन सिन्‍हा गुरुजी यांनी केले.

मंदिराचे सरकारीकरण टाळण्‍यासाठी विश्‍वस्‍तांनी नियमांचे पालन करावे !  – माजी मुख्‍य जिल्‍हा न्‍यायाधीश अधिवक्‍ता दिलीप देशमुख, पुणे

अधिवक्‍ता दिलीप देशमुख

विद्याधिराज सभागृह – मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांनी मंदिरांचे व्‍यवस्‍थापन चांगले ठेवले, मंदिराशी संबंधित नियमांचे पालन केले, तसेच विश्‍वस्‍थांमधील अंतर्गत वाद टाळले, तर सरकारला कोणतेही मंदिर सरकारी नियंत्रणात घेण्‍याची संधी मिळणार नाही, तसेच त्‍यांचे मंदिर सरकारच्‍या कह्यात जाण्‍यापासून वाचवता येईल, असे वक्‍तव्‍य माजी मुख्‍य जिल्‍हा न्‍यायाधीश अधिवक्‍ता दिलीप देशमुख यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या पाचव्‍या दिवशी केले. ते ‘मंदिर व्‍यवस्‍थापनावर सरकारी नियंत्रण टाळण्‍यासाठी करायचे प्रयत्न’ या विषयावर बोलत होते.

मंदिरांचे सरकारीकरण रोखण्‍यासाठी काय करता येईल, याविषयी सांगतांना त्‍यांनी सांगितले, ‘महाराष्‍ट्रातील पंढरपूर येथील सुप्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिराच्‍या व्‍यवस्‍थापनाविषयी तक्रारी असल्‍यामुळे त्‍याला सरकारच्‍या नियंत्रणात घेण्‍यात आले’, असे स्‍पष्‍टीकरण सरकारने उच्‍च न्‍यायालयात दिले आहे. कुठल्‍याही मंदिराचे सरकारीकरण टाळण्‍यासाठी मंदिराने अंदाजपत्रक सादर करावे, मंदिराची मिळकत आणि व्‍यय यांचे खाते ठेवावे, संबंधित मंदिराच्‍या विश्‍वस्‍त मंडळाने त्‍याच्‍या अचल आणि चल मालमत्तेविषयी नोंदणी ठेवावी, प्रत्‍येक ३ मासांनी व्‍यवहाराची पडताळणी करावी. यासमवेत धर्मादाय आयुक्‍तांनी काढलेल्‍या परिपत्रांचे पालन करणे आवश्‍यक आहे. एवढेच नाही, तर मंदिर विश्‍वस्‍तांनी चुकीच्‍या ठिकाणी व्‍यय करणे टाळावे, मंदिराच्‍या विश्‍वस्‍तावर कोणताही गंभीर गुन्‍हा नोंद असू नये. मंदिराच्‍या व्‍यवस्‍थापनात असलेले अंतर्गत वाद सर्वांत मोठी समस्‍या आहे. त्‍यामुळे आपले मंदिर कह्यात घेण्‍यासाठी सरकारला संधी मिळते.’’

शेगाव मंदिराचे आदर्श व्‍यवस्‍थापन कौतुकास्‍पद !

भारतात सुव्‍यवस्‍थान असलेल्‍या मंदिरांमधील एक चांगले उदाहरण म्‍हणून महाराष्‍ट्रातील शेगाव मंदिराचे नाव घेता येईल. तेथील स्‍वच्‍छता आणि व्‍यवस्‍था वाखाणण्‍याजोगी आहे. तेथे अल्‍प नोकर असून बहुतांश सेवेकरी आहेत. तेथे सेवा देण्‍यासाठी २ वर्षांची प्रतीक्षा सूची आहे. विश्‍वस्‍तांनी या मंदिराचे १० टक्‍के अनुकरण केले, तरी त्‍यांच्‍या मंदिरांच्‍या व्‍यवस्‍थेमध्‍ये मोठे परिवर्तन दिसून येईल. – माजी मुख्‍य जिल्‍हा न्‍यायाधीश अधिवक्‍ता दिलीप देशमुख, पुणे

‘जेथे हिंदुत्‍व, तेथेच बंधुत्‍व’ हा विचार मंदिरांच्‍या सुरक्षितेसाठी आवश्‍यक ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री.सुनील घनवट

विद्याधिराज सभागृह – अनेक मंदिरांच्‍या जवळ जे हिंदु धर्म किंवा मूर्तीपूजा मानत नाहीत, अशा अहिंदूंची दुकाने आहेत. यातून हिंदूंचा पैसा अन्‍य धर्मियांकडे जाऊन तो हिंदूंच्‍याच विरोधात वापरला जातो. दंगलीच्‍या वेळी हे धर्मांध लोक हिंदूंच्‍या मंदिरांना लक्ष्य करतात. त्‍यामुळे ‘जेथे हिंदुत्‍व, तेथे बंधुत्‍व’ हा विचार मंदिरांच्‍या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक आहे. पंढरपूरसारख्‍या महाराष्‍ट्रातील प्रसिद्ध मंदिराच्‍या आवारातही अन्‍य धर्मियाचे हॉटेल असून त्‍या हॉटेलचे नाव हिंदुपद्धतीने ठेवण्‍यात आले आहे. या हॉटेलमध्‍ये जाणार्‍यांना हलाल (इस्‍लामी पद्धतीनुसार बनवलेले) खायला घातले जात असल्‍यास नवल वाटायला नको. काही ठिकाणी मंदिरांच्‍या जीर्णोद्धारासाठी हिंदू कारागीर मिळत नाहीत; म्‍हणून मुसलमान कारागिरांना बोलावले जाते. मूर्तीला मानत नसलेले आणि गोमांस खाणारे मंदिरे बांधण्‍याचे काम करतात.

महाराष्‍ट्रातील शनिशिंगणापूर देवस्‍थानमध्‍ये ६-७ मुसलमान कर्मचारी कार्यरत आहेत. कोणत्‍या मशिदीमध्‍ये हिंदूंना विश्‍वस्‍त म्‍हणून नियुक्‍त केले जाते का ? मग सरकारीकरण केलेल्‍या मंदिरांमध्‍ये अन्‍य धर्मियांची नियुक्‍ती कशी केली जाते ? यांविषयी हिंदूंनी गांभीर्याने विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे. मंदिरे सुरक्षित राहिली तर राष्‍ट्र आणि हिंदू सुरक्षित रहातील. अयोध्‍येत श्री रामलल्लाची स्‍थापना झाल्‍यावर संपूर्ण भारतासह विश्‍वात उत्‍साह निर्माण झाला. आजही हा उत्‍साह आहे. त्‍यामुळे केवळ काशी, मथुरा नव्‍हे, तर सरकारच्‍या नियंत्रणाखाली असलेली देशातील साडेचार लाख मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्‍त करून भक्‍तांकडे सोपवायला हवीत. प्रत्‍येक मंदिरे सनातन धर्मरक्षणाचे केंद्र व्‍हायला हवे, असे वक्‍तव्‍य हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍यांचे समन्‍वयक श्री. सुनील घनवट यांनी ‘मंदिरांचे व्‍यवस्‍थापन आणि आणि परिसर येथे अहिंदूंना स्‍थान नको’ या विषयावर बोलतांना केले.