सनातन संस्‍थेच्‍या ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍ताविक विवेचन’ या गुजराती ‘ई-बुक’चे प्रकाशन !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाचा पाचवा दिवस

डावीकडून श्री. सुनील घनवट, ई-बूकचे प्रकाशन करतांना पू. प्रा. पवन सिन्‍हा गुरुजी, माजी मुख्‍य जिल्‍हा न्‍यायाधीश अधिवक्‍ता दिलीप देशमुख आणि श्री. गुरुप्रसाद गौडा

विद्याधिराज सभागृह – वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या ५ व्‍या दिवशी म्‍हणजे २८ जून या दिवशीच्‍या पहिल्‍या सत्रात सनातन संस्‍थेच्‍या ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍ताविक विवेचन’ या गुजराती ‘ई-बुक’चे प्रकाशन उत्तरप्रदेशातील पावन चिंतन धारा आश्रमचे संस्‍थापक पू. प्रा. पवन सिन्‍हा गुरुजी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या वेळी व्‍यासपिठावर माजी मुख्‍य जिल्‍हा न्‍यायाधीश अधिवक्‍ता दिलीप देशमुख, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍यांचे समन्‍वयक श्री. सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र राज्‍य समनव्‍यक श्री. गुरुप्रसाद गौडा उपस्‍थित होते.