देशभरात १४ एप्रिलपर्यंत पथकर वसुलीला स्थगिती

देशभरात दळणवळण बंदी लागू असल्याने कारणाविना वाहनाने कुणालाही प्रवास करता येत नाही. या काळात अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, तसेच वैद्यकीय कारणास्तव होणार्‍या वाहतुकीलाच अनुमती आहे.

भारतात १५ मेपर्यंत १३ लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता

लोकहो, हा वेग रोखणे आपल्या सर्वांच्या हातात आहे, हे लक्षात घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन प्रयत्न करूया !

देशात कोरोनाच्या मृतांची संख्या वाढणार नाही ! – डॉ. नरिंदर मेहरा, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद

रोग प्रतिकारशक्तीमध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे. त्यामुळे इतर देशांप्रमाणे भारतात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या वाढणार नाही; पण हे सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. देशात अल्प प्रमाणात मृत्यू होण्याची ३ कारणे असून यामध्ये शारीरिक अंतर, रोगप्रतिकार शक्ती आणि…

केंद्रशासनाकडून ‘अँटी मलेरिया’ (मलेरिया प्रतिबंधक) औषधावर निर्यातबंदी !

देशात कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘हायड्रोक्सी क्लोरोक्वीन’ या ‘अँटी मलेरिया’ (मलेरिया प्रतिबंधक) औषधाची निर्यात बंद करण्यात आली आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हे औषध कोरोनाच्या विरोधात प्रभावी ठरत आहे.

तांब्याच्या वस्तूंवरील विषाणू काही मिनिटांतच नष्ट होतात ! – संशोधनाचा दावा

तांब्याच्या वस्तूंवर एखादा विषाणू असला, तर तो काही मिनिटांतच नष्ट होतो, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज ‘जी-२०’ राष्ट्रांची आपत्कालीन परिषद, पंतप्रधान नरेंद्र मोदीही होणार सहभागी

कोरोनाच्या जागतिक महामहारीमुळे जगभरातील सर्वच देशांना त्याचा फटका बसला असून या संकटातून तोडगा काढण्यासाठी आज ‘जी-२०’ राष्ट्रांची आपत्कालीन परिषद आयोजित करण्यात आली आहे.

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत २२ सहस्र ६५ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत २१ सहस्र २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ घंट्यांमध्ये अनुमाने २ सहस्र ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४ लाख ७२ सहस्र २९ झाली असून उपचार करून बरे झालेल्यांची संख्या १ लाख १४ सहस्र ७१३ इतकी आहे.

देहलीत संचारबंदी केल्यामुळे प्रदूषणात कमालीची घट

कोरोनाचा असाही परिणाम ! आता देहलीतील नागरिक काही दिवस तरी स्वच्छ हवा अनुभवतील !

देशभरात घरून काम केले जात असल्यामुळे मंदावला इंटरनेटचा वेग !

अनेक जण ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ खेळत असल्याचे उघड : घरून काम करण्याचे प्राधान्य अग्रक्रमात असतांना सरकारने ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ यांवर बंदी आणून कामे पूर्ण होण्यासाठी इंटरनेटला गती उपलब्ध करून द्यावी, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

वृत्तपत्रांना आडकाठी न करता वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी साहाय्य करा ! – केंद्रशासनाचे निर्देश

संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी आणि इतर कडक निर्बंध लादले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर योग्य आणि आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी सर्व वृत्तसंस्था, मुद्रित (वृत्तपत्र) आणि दूरचित्रवाहिन्या यांमध्ये काम करणार्‍या संस्था अन् तेथील कर्मचारी यांना कोणतीही…