कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज ‘जी-२०’ राष्ट्रांची आपत्कालीन परिषद, पंतप्रधान नरेंद्र मोदीही होणार सहभागी

नवी देहली – कोरोनाच्या जागतिक महामहारीमुळे जगभरातील सर्वच देशांना त्याचा फटका बसला असून या संकटातून तोडगा काढण्यासाठी आज ‘जी-२०’ राष्ट्रांची आपत्कालीन परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सहभागी होणार आहेत. ही परिषद ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे होणार आहे. सौदी अरेबियाचे राजे शाह सलमान हे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत.