देहलीत संचारबंदी केल्यामुळे प्रदूषणात कमालीची घट

कोरोनाचा असाही परिणाम ! आता देहलीतील नागरिक काही दिवस तरी स्वच्छ हवा अनुभवतील !

नवी देहली – कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून देशातील काही राज्यांनी ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) करण्यासह संचारबंदीही लागू केली आहे. अशाच प्रकारे राजधानी देहलीतही संचारबंदी आणि दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे देहली शहरातील प्रदूषणात कमालीची घट झाली आहे. येथे प्रदूषणाचे प्रमाण दाखणारा मीटर नेहमी लाल किंवा पिवळ्या रंग दाखवत असे. याचा अर्थ तेथील प्रदूषणाची पातळी ही अधिक प्रमाणात होती; मात्र हा मीटर आता हिरवा रंग दाखवत आहे. यावरून प्रदूषणाचा अभ्यास करणार्‍या ‘सफर’ संस्थेने दिलेल्या माहितीनुसार २४ मार्च या दिवशी देहलीतील हवेचा स्तर सामान्य होता. याआधी म्हणजे ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यापूर्वी हवेचा स्तर फारच खालावला होता. मुंबई आणि पुणे येथेही प्रदूषण न्यून झाले आहे, असे सांगितले जात आहे.