निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी धर्मांधांनी हिंदूचे घर जाळले !

बांगलादेशमध्ये ३१ डिसेंबरला सार्वजनिक निवडणुका होणार आहेत. येथे पुन्हा एकदा धर्मांधांकडून हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी सरकारच्या साहाय्याने ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना विस्थापित केले !

बांगलादेशमधील धर्मांधांनी तेथील इस्लामी सरकारच्या साहाय्याने ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांचे कुटुंबीय यांची भूमी बलपूर्वक गिळंकृत करून त्यांना विस्थापित केले.

बांगलादेश सरकार आजपासून २ सहस्र २६० रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवणार

जे बांगलादेशसारख्या इस्लामी राष्ट्राला जमते, ते हिंदूबहुल भारतातील हिंदुत्वनिष्ठ भाजप सरकारला का जमत नाही ? हे सरकारला लज्जास्पद !

‘जमायतुल मुजाहिदीन बांग्लादेश’चा म्होरक्या खुर्शीद आलम पोलीस चकमकीत ठार

‘जमायतुल मुजाहिदीन बांग्लादेश’ अर्थात् जे.एम्.बी. या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या खुर्शीद आलम हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना येथील न्यायालयाने ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

बांगलादेशच्या हिंदु क्रिकेटपटूला फेसबूकवरून दुर्गादेवीचे चित्र काढून टाकण्यास धर्मांधांनी बाध्य केले होते !

नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाच्या लीतोन दास या हिंदु क्रिकेटपटूने शतक झळकावले होते. त्यामुळे त्याचे बांगलादेशामध्ये कौतुक केले जात आहे

परिवाराच्या हत्येच्या भीतीने बांगलादेश सोडला ! – बांगलादेशातील पहिले (माजी) हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा

बांगलादेशातील पहिले हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा यांनी वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून परिवारासह ऑस्ट्रेलियामध्ये पलायन केले. आता ते अज्ञात ठिकाणी रहात आहेत. तेथून ‘बीबीसी’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘माझ्या परिवाराची हत्या होण्याच्या भीतीने बांगलादेश सोडला….

भारताकडून बांगलादेशातील रोहिंग्या मुसलमानांसाठी मोठ्या प्रमाणात साहाय्य !

भारताने बांगलादेशामध्ये शरण घेतलेल्या ७ लाख रोहिंग्या मुसलमानांसाठी ११ लाख लीटरहून अधिक केरोसिन, २० सहस्र स्टोव्ह आणि अन्य साहित्य दिले आहे. भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले की, बांगलादेशाने मागितलेल्या साहाय्यानुसार ते करण्यात आले आहे.

बांगलादेशात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त लावलेली भित्तीपत्रके धर्मांधाने काढली !

बांगलादेशाची राजधानी असलेल्या ढाका शहरात इस्लामी वेशभूषा केलेला एका वृद्ध रस्त्याच्या शेजारी असणार्‍या भिंतीवर कृष्ण जन्माष्टमीनिमित्त लावण्यात आलेली भित्तीपत्रके काढून टाकत असल्याची एक चित्रफीत सध्या सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे.

बांगलादेशामध्ये महिला पत्रकाराची घरात घुसून निर्घृण हत्या

बांगलादेशाच्या पबना जिल्ह्यातील राधानगर येथे रहाणार्‍या सुबर्ना नोदी या ३२ वर्षीय महिला पत्रकाराची त्यांच्या घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now