Muhammad Yunus : (म्हणे) ‘प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि हक्क यांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत !’

बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे भारतीय परराष्ट्र सचिवांना आश्‍वासन !

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशातील नागरिकाचा वंश, रंग, पंथ किंवा धर्म काहीही असो, देशातील अंतरिम सरकार प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि हक्क यांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे आश्‍वासन सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांनी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. या बैठकीमध्ये युनूस यांनी बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध अतिशय दृढ असल्याचे सांगितले. अलीकडच्या काळात दोन्ही शेजारी देशांमधील संबंधांवर निर्माण झालेले काळे ढग दूर करण्यासाठी भारताने साहाय्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी युनूस यांनी भारताकडून आलेल्या वक्तव्याचे विशेषतः शेख हसीना यांच्या वक्तव्याचे सूत्र उपस्थित करत म्हटले की, तेथून अनेक विधाने येत असल्याने आमचे लोक चिंतित आहेत. यामुळे तणाव निर्माण होतो.

ढाका जमुना अतिथीगृहात झालेल्या ४० मिनिटांच्या बैठकीत बांगलादेशातील अल्पसंख्यांकांचे प्रश्‍न, चुकीची माहिती, शेख हसीना यांचे भारतातील वास्तव्य, प्रादेशिक सहकार्य आणि जुलै-ऑगस्टमधील लोकांचे उठाव यांवर चर्चा झाली.

संपादकीय भूमिका

युनूस यांच्या या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ? अशा प्रकारची खोटी  विधाने करणार्‍यांसमवेत भारताने चर्चा करण्यापेक्षा या देशावर सैन्य कारवाई करणेच आवश्यक आहे !