बांगलादेशातील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते गयेश्वर चंद्र रॉय यांचे भारतद्वेषी विधान !

ढाका (बांगलादेश) : बांगलादेश हा एक स्वतंत्र देश आहे आणि देशातील लोक इतके बुद्धीमान आहेत की, त्यांना ठाऊक आहे की, कोण काय काम करण्यास सक्षम आहे. यासाठी त्यांना बाहेरून सल्ला घेण्याची आवश्यकता नाही. (जर ते इतके सक्षम आहेत, तर वर्ष १९७१ च्या वेळी त्यांना भारत आणि भारतीय सैन्य यांची आवश्यकता का भासली ? त्यांनी स्वतःची बुद्धी वापरून पाकिस्तानी सैन्याशी दोन हात करून बांगलादेश स्वतंत्र का केला नाही ? – संपादक) आवश्यकता भासल्यास आम्ही परदेशातून सल्लागार आणू शकतो. कोणत्याही स्वतंत्र देशाच्या लोकांना त्याच्या अंतर्गत गोष्टींमध्ये इतर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप आवडत नाही, अशा शब्दांत बांगलादेशातील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बी.एन्.पी.चे) नेते गयेश्वर चंद्र रॉय यांनी भारतावर टीका केली. ते बी.एन्.पी.चे संस्थापक झियाउर रहमान यांच्या कबरीवर श्रद्धांजली वहाण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना पत्रकारांकडून बांगलादेशाच्या भारताशी असलेल्या संबंधांबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देतांना त्यांनी भारतावर देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला.
“India should stop interfering in our affairs!” – An anti-India statement by Gayeshwar Chandra Roy, leader of the Bangladesh Nationalist Party
Instead of advising India on what it should or should not do, Gayeshwar Chandra Roy should first address the ongoing ethnic cleansing of… pic.twitter.com/jPb67SDBtk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 11, 2024
गयेश्वर चंद्र रॉय पुढे म्हणाले की,
१. गेल्या काही वर्षांत भारताचे वर्चस्व आपण पाहिले आहे. उदाहरणार्थ भारत सरकारकडून हिरवा कंदील मिळल्याखेरीज बांगलादेशातील बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती केली जाऊ शकत नाही. देशाचे मुख्य न्यायाधीश कोण असतील, खासदार किंवा मंत्री कोण असतील, अशा सर्व निर्णयांमध्ये भारताचा प्रभाव असतो.
२. भारत हा आपला शेजारी देश आहे आणि जर आपली मैत्री हितसंबंध अन् आदर यांवर आधारित असेल, तर ती दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरेल आणि भविष्यही सकारात्मक असेल.
३. द्विपक्षीय संबंध वैयक्तिक किंवा पक्ष आधारित नसून देश ते देश असले पाहिजेत. जर भारताला याची जाणीव झाली, तर तो बांगलादेशाशी संबंध दृढ करण्यासाठी निःसंशयपणे योग्य दृष्टीकोन स्वीकारेल.
संपादकीय भूमिका
|