Ruhul Kabir Rizvi Of BNP : (म्हणे) ‘भारताने चितगाव मागितल्यास बंगाल, बिहार आणि ओडिशा परत घेऊ !’

ढाका (बांगलादेश) येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर भारतविरोधी मोर्चा काढत धमकी !

ढाका (बांगलादेश) – भारत प्रत्येक पावलावर बांगलादेशाची हानी करू शकतो. बांगलादेशातील लोक त्याला आवडत नसल्याने त्याने शेख हसीना यांना आश्रय दिला. भारत कुणाशीही मैत्री करू शकत नाही. भारताने चितगाव मागितल्यास बंगाल, बिहार आणि ओडिशा परत घेऊ, अशी धमकी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी येथे दिली. या पक्षाच्या वतीने ८ डिसेंबरला येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर मोर्चा काढून भारताचा निषेध करण्यात आला. त्या वेळी रिझवी बोलत होते. या वेळी या पक्षाकडून भारतीय उच्चायुक्तांना निवेदन देण्यात आले. मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय उच्चायुक्तालयासमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा झाल्यानंतरही तेथे सैन्याच्या ३ तुकड्यांसह पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.

रुहुल कबीर रिझवी यांनी पुढे म्हटले की, भारताच्या आशीर्वादाने शेख हसीना यांनी १६ वर्षे बांगलादेशावर राज्य केले. भारताने बांगलादेशींना व्हिसा (एखाद्या देशात प्रवेश करण्यासाठी देण्यात येणारे अनुमती पत्र) देणे बंद केल्याने बांगलादेशाला लाभ झाला. त्यामुळे बांगलादेश आता समृद्ध होईल. उत्पादन वाढेल. भारताने सीमा बंद करून चांगले काम केले. अमली पदार्थ भारतातून यायचे; पण आता येणार नाहीत.

संपादकीय भूमिका

भारताकडून पाठवण्यात येत असलेल्या अन्नधान्यांवर जगणार्‍या मुसलमानबहुल बांगलादेशाने त्याची खरी मनोवृत्ती दाखवून दिली आहे. ‘सापांना दूध पाजल्यावरहही ते विषच ओकणार’, हे भारताला कधी कळणार ?, हाच प्रश्‍न आहे !