Bangladesh Retired Major Sharif : (म्हणे) ‘आम्ही ४ दिवसांत कोलकात्यावर नियंत्रण मिळवू !

बांगलादेशाच्या निवृत्त मेजरची भारताला धमकी

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण होत असतांना आता निवृत्त सैन्याधिकार्‍यांकडून भारताच्या विरोधात विधाने केली जात आहेत. बांगलादेशाचे निवृत्त मेजर शरीफ यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिका हेदेखील आमच्यासमोर उभे राहू शकत नाहीत. बांगलादेशातील ३० लाख विद्यार्थी आमच्या पाठीशी उभे आहेत. आवश्यकता भासल्यास बांगलादेश ४ दिवसांत कोलकात्यावर नियंत्रण मिळवू शकतो.

(म्हणे) ‘कोणतीही शक्ती आम्हाला रोखू शकत नाही !’

मेजर शरीफ पुढे म्हणाले की, मला भारताला सांगायचे आहे की, आम्ही ४ दिवसांत सर्व समस्या सोडवू शकतो. आमचे सैन्य सशक्त आहे आणि आमचे लोक आमच्यासमवेत आहेत. कोणतीही शक्ती आम्हाला रोखू शकत नाही.

१० डिसेंबरला बांगलादेशाच्या दूतावासावर काढण्यात येणार मोर्चा

देहलीमध्ये २०० हून अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधित्व करणार्‍या नागरी संस्थांचे सदस्य १० डिसेंबर या दिवशी बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात बांगलादेशी दूतावासावर निषेध मोर्चा काढणार आहेत. ‘सिव्हिल सोसायटी ऑफ देहली’ यांच्याकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. १० डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशातील निवृत्त सैन्याधिकार्‍याला जे वाटते, ते सध्या बांगलादेशी सैन्यात असणार्‍या अधिकार्‍यांनाही वाटत असणार. त्यामुळे बांगलादेशाचा भारताशी युद्ध करण्याचा कंड शमवण्यासाठी भारताने आता बांगलादेशात घुसणेच आवश्यक झाले आहे !
  • आक्रमण हाच बचावाचा प्रमुख मार्ग आहे, असे म्हटले जाते. तो मार्ग भारताने अवलंबणे आवश्यक आहे. यातून बांगलादेशाच्या धर्मांध मुसलमानांना जो माज चढला आहे, तो उतरवला गेलाच पाहिजे !