Bangladesh-Pakistan Security Clearance : बांगलादेशाने पाकिस्तानी नागरिकांना देशात ‘सुरक्षा अनुमती’ न घेताच प्रवेश घेण्याची दिली अनुमती !

इतिहासाकडे दुर्लक्ष करणारा बांगलादेश !

ढाका (बांगलादेश) : पाकिस्तानी नागरिकांना बांगलादेशी व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी बांगलादेशाच्या सुरक्षा सेवा विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते; मात्र आता बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने ही अट रहित केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक आता सुरक्षेच्या अनुमतीविनाही बांगलादेशात प्रवेश करू शकणार आहेत.

बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन

बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेनबांगलादेशरचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांनी सांगितले की, आमचे सरकार पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यातच पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात थेट सागरी संपर्क चालू झाला. त्यानंतर पाकिस्तानातील कराची येथून एक मालवाहू नौका बंगालच्या उपसागरातून बांगलादेशातील चितगाव बंदरात पोचली.

भारतासमवेतच्या संबंधांत पालट झाला ! – बांगलादेश

तौहीद हुसेन म्हणाले की, ५ ऑगस्टनंतर भारतासमवेतच्या संबंधांमध्ये पालट झाला, हे वास्तव आहे. मला विश्‍वास आहे की, पालटलेल्या परिस्थितीत बांगलादेशाशी संबंध कसे पुढे न्यावेत, हे भारताला समजेल. (बांगलादेशासमवेत भारताने कोणतेच संबंध ठेवू नयेत. यातूनच बांगलादेशाला त्याने कसा आत्मघात केला आहे, हे त्याच्या लक्षात येईल ! – संपादक)


हे पण वाचा –

♦ Taslima Nasreen : बांगलादेशासाठी स्वतःचे १७ सहस्र सैनिक गमावलेला भारत शत्रू, तर ३० लाख लोकांना मारणारा पाक मित्र !
https://sanatanprabhat.org/marathi/861318.html


संपादकीय भूमिका

बांगलादेशाच्या अधःपतनाला प्रारंभ झाला आहे. वर्ष १९७१ पूर्वी याच पाकिस्तान्यांनी बांगलादेशात ३० लाख लोकांची हत्या केली होती, तर लक्षावधी महिलांवर बलात्कार केला होता, या इतिहासाकडे दुर्लक्ष करणार्‍या बांगलादेशात पुन्हा असेच घडले, तर आश्‍चर्य वाटू नये !