संपादकीय : मुंबईतील ‘हाऊसिंग जिहाद’ !

शिवसेनेचे उपनेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईमध्ये ‘हाऊसिंग जिहाद’ चालू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड केला. आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’, ‘लँड (भूमी) जिहाद’, ‘थूँक (थुंकी) जिहाद’ आदी विविध जिहादची हिंदूंविरोधातील नियोजनबद्ध षड्यंत्रे वेळोवेळी उघड झाली आहेत. यात ‘हाऊसिंग जिहाद’ची भर पडली आहे. संजय निरुपम यांनी सांगितल्यानुसार वस्तूस्थिती असेल, तर ‘हाऊसिंग जिहाद’ भविष्यात हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. संजय निरुपम यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईमध्ये मुसलमान विकासकांची ‘लॉबी’ झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामध्ये कार्यरत आहे. हे मुसलमान विकासक म्हणजेच ‘बिल्डर’ या प्रकल्पांमध्ये मुसलमान लाभार्थी वाढवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांद्वारे प्राप्त होणार्‍या सदनिका मुसलमानांना कशा मिळतील, यासाठी मुसलमान विकासक काम करत आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामध्ये एका लाभार्थ्याला एकच सदनिका प्राप्त होते; मात्र मुंबईतील काही प्रकल्पांमध्ये एका मुसलमान व्यक्तीच्या नावे अनेक सदनिका घेण्यात  आल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. यामध्ये विकासक आणि ज्यांच्या नावांवर सदनिका नोंद करण्यात आल्या आहेत, ते सर्व मुसलमान आहेत. याचे नावानिशी पुरावेही संजय निरुपम यांनी सादर केले आहेत. यावरून हा प्रकार वाटतो, तितका छोटा नाही. ‘एकाच व्यक्तीच्या नावे अनेक सदनिका लाटणे’, हा भ्रष्टाचार आहे; परंतु हे प्रकरण केवळ भ्रष्टाचारापुरते सीमित नाही. या सदनिका केवळ मुसलमानांनाच देणे आणि या प्रकल्पांमध्ये मुसलमानांना बहुसंख्य करणे हा प्रकार मुंबईत मुसलमानांचे संख्याबळ वाढवण्याचे म्हणजेच इस्लामला प्रबळ करण्याचे षड्यंत्र आहे. हा सदनिका जिहाद असाच चालू राहिला, तर येत्या काळात ‘शहर जिहाद’, ‘तालुका जिहाद’, ‘राज्य जिहाद’ आणि संपूर्ण भारत इस्लामच्या धर्मांधतेचा बळी ठरेल. भारतात ज्या गतीने मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे, त्यावरून हा प्रकार चालूही झाला आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.

वर्ष २०२३ मध्ये आतंकवादविरोधी पथकाला आतंकवादी मजहर मन्सूर खान याच्या भ्रमणभाषमध्ये ‘इंडिया २०४७ टुवर्डस रूल ऑफ इस्लाम इन इंडिया’ हे पुस्तक सापडले. या पुस्तकात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या आतंकवादी संघटनेचे वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचे मनसुबे लिहिलेले आढळले होते. मुंबईतील ‘सदनिका जिहाद’चा प्रकार हा याच कटाचा भाग असेल, हे नाकारून चालणार नाही. संजय निरुपम यांनी त्यांना आढळलेल्या केवळ २ प्रकल्पांची माहिती दिली आहे. ही माहिती देतांना झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत अन्य प्रकल्पांचे अन्वेषण केल्यास ‘हाऊसिंग जिहाद’च्या घटना बाहेर पडतील, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन याविषयी सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे.

मुंबईतील इस्लामीकरणाची पाळेमुळे खाेलवर !

भारताच्या इस्लामीकरणाचे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे षड्यंत्र वर्ष २०२३ मध्ये उघड झाले असले, तरी भारताच्या इस्लामीकरणाचा अजेंडा मोगलांच्या आक्रमणापासूनच चालू आहे. यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही होत अखंड भारताची अनेक शकले पडली. मुंबईसारख्या भारताच्या आर्थिक राजधानीमध्ये मागील काही वर्षांत मुसलमानांनी ज्या प्रकारे संख्याबळ वाढवले आहे, ते पहाता येत्या काळात  हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबईच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र नियोजनबद्ध चालू आहे. मुंबईतील मालवणी, ज्ञानेश्वरनगर, इंदिरानगर झोपडपट्टी, शिवाजीनगर, चिता कँप, शिवडी क्रॉस रोड, सेनानगर, लेबर कँप, डॉकयार्ड रोड, जिजामातानगर (वरळी), प्रेमनगर, शास्त्रीनगर (वरळी), नेहरूनगर (कुर्ला), आझमीनगर (राठोडी), कापडबाजार (माहीम), बेहरामपाडा, भारतनगर, दारूखाना, बगीचा वस्ती, गोपीनाथ शिवनेरी कॉ. सोसायटी, संगमगल्ली, चिरागनगर, अंबुजवाडी आदी २० हून अधिक ठिकाणी मागील काही वर्षांपासून मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकेकाळी हा सर्व भाग हिंदूबहुल होता. यातून ‘हाऊसिंग जिहाद’ची पाळेमुळे मुंबईत किती घट्ट रोवली गेली आहेत, याची कल्पना येईल. यासाठी भारताबाहेरील इस्लामिक शक्तींकडून पैसा पुरवला जात आहे, त्याविना हे शक्य नाही.

समाजघातकी अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी !

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर १५ हून अधिक सदनिकांची नोंद होत असेल, तर ही केवळ विकासकाच्या हातातील गाेष्ट नाही. प्रशासकीय पातळीवरील मोठ्या अधिकार्‍यांच्या संगनमताविना हे शक्य नाही. त्याही पुढे ‘सरकारमधील मंत्र्यांना याचे हप्ते जात आहेत का ?’ याचेही अन्वेषण व्हायला हवे. सरकारी योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार सर्वपरिचित आहेत; परंतु यातून राष्ट्र आणि समाज यांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पहायला हवे. मुसलमान विकासकांना पैशासाठी सहकार्य करणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण आहेत ? याचा शोध सरकारने घ्यावा. निरूपम यांना ‘हे सूत्र खरोखरच गांभीर्याने घ्यायला हवे’, असे वाटत असेल, तर केवळ पत्रकार परिषदेची औपचारिकता पार न पाडता राज्यात सत्तेत असलेल्या स्वपक्षाच्या नेत्यांपर्यंत हे सूत्र गांभीर्याने पोचवून कारवाई होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. येत्या काही मासांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येईल. त्या वेळी ‘लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमानांची मते हिंदूंच्या विरोधात जातील’, हे सांगायला कुणा तज्ञाची आवश्यकता नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही मुंबईतील मुसलमानबहुल भागांमध्ये महायुतीला अल्प मते मिळाली; मात्र हा केवळ राजकीय प्रश्न नाही. हिंदुत्वनिष्ठ पक्षांना सत्ता हवी असेल, तर प्रथम भारत हिंदूबहुल रहायला हवा, हे हिंदुत्वनिष्ठ पक्षातील नेत्यांनी समजून घ्यायला हवे.

वर्ष १९९३ च्या दंगलीपासून मुंबईमध्ये धर्मांध आणि आतंकवादी यांनी घडवलेले बाँबस्फोट अन् दंगली यांमध्ये १ सहस्र ३०६ नागरिक ठार झाले. या सर्व घटना स्थानिक धर्मांध मुसलमानांच्या सहकार्याने घडल्या आहेत, ही वस्तूस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळे मुंबई किंवा देश मुसलमानबहुल होणे ही केवळ हिंदूंसाठी नव्हे, तर राष्ट्रासाठीही धोक्याची घंटा आहे. बांगलादेशी घुसखोरांना बनावट ओळखपत्र देणे, त्यांना भारतात वसवणे, लव्ह जिहाद करणे हे प्रकार पैसे चारून होत आहेत. हे प्रकार करणारे आणि त्यांना प्रोत्साहन देणारे या सर्वांविरोधात सरकारने ठोस पाऊल उचलायला हवे, ही काळाची आवश्यकता आहे !

मुंबई किंवा भारत मुसलमानबहुल होणे, ही केवळ हिंदूंसाठी नव्हे, तर राष्ट्रासाठीही धोक्याची घंटा आहे !