सावधान, देशद्रोही आणि जिहादी कारवाया करत आहेत !

खरे तर स्वातंत्र्यानंतर देशात आजच्यासारखी भीतीदायक सामाजिक-राजकीय परिस्थिती कधीच नव्हती. पाकिस्तानविरुद्धची ३ युद्धे आणि चीनबरोबरचे एक युद्ध, कुप्रसिद्ध आणीबाणीचा काळ अन् तुरळक जातीय चकमकी इत्यादी घटना अस्वस्थ करणार्‍या असल्या, तरी त्यांच्यात समाजाची रचनाच नष्ट करण्याची कोणतीही क्षमता नव्हती. अशा सर्व अशांत परिस्थिती असूनही देश एकजूट राहिला आणि देशाचे परदेशातील अन् अंतर्गत शत्रू यांचा एकाच वेळी एका खडकाप्रमाणे राहून सामना केला. प्रामुख्याने या एकतेच्या भावनेमुळेच शस्त्रास्त्रे आणि इतर लष्करी साधनांची भीषण कमतरता असूनही आपण पाकिस्तानच्या विरोधातील ३ युद्धे जिंकू शकलो.

१. भारतातील अंतर्गत सुरक्षेच्या धोक्यामुळे देशात निर्माण झालेली अस्थिरता

अधिवक्ता डॉ. एच्.सी. उपाध्याय

आज पुन्हा एकदा देश संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. केंद्रातील, तसेच बहुतांश राज्यांमधील मजबूत राष्ट्रवादी सरकारांमुळे पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून धोका असल्याची धारणा लक्षणीयरित्या न्यून झाली असली, तरी अंतर्गत धोक्यात मोठी वाढ झाली आहे. या अंतर्गत सुरक्षेविषयीच्या धोक्यामुळे केवळ लोकांचे जीवन आणि सुरक्षाच नव्हे, तर राज्यघटनेत अंतर्भूत असलेली एकता, अखंडता अन् सार्वभौमत्व या अत्यंत प्रिय आदर्शांनाही धोका निर्माण झाला आहे.

२. सध्याची राजकीय सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्ष

अशी परिस्थिती निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. याविषयी सांगायचे झाले, तर सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना विरोध करणार्‍या पक्षांची प्रदीर्घ राजकीय सुप्तावस्था. या विरोधी पक्षांनी मतदारांना गृहीत धरले होते. अनेक दशके या ना त्या प्रकारे सत्तेशी चिकटून राहिल्यामुळे ते गाढ झोपेच्या गर्तेत होते; कारण त्यांनी त्यांच्या दीर्घ राजवटीमध्ये त्यांच्या बाजूने फुटलेल्या विरोधाला विभाजित करणे, तोडणे आणि हाताळणे यांविषयीची कला आत्मसात् केली होती. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांनी या विरोधी पक्षांना एकदा किंवा दोनदा नव्हे, तर ३ वेळा विक्रमी मोठा धक्का दिला. त्यामुळे हे निराश झालेले, सत्ता उलथवून टाकण्याचा हेतू असलेले विरोधक नैसर्गिकरित्या वेडे झाले आहेत. राजकीय सत्ता परत मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊन काहीही करण्यास सिद्ध आहेत.

३. वैयक्तिक स्वार्थासाठी धर्मांधांचा विरोधी पक्षांना पाठिंबा

त्यानंतर मुसलमान समुदायातील कट्टर धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात केलेले प्रजनन आहे. लोकशाहीचा आकड्यांचा खेळ लक्षात घेता हे धर्मांध वारंवार पराभूत होणार्‍या विरोधी पक्षांना पाठिंबा देतात. या व्यतिरिक्त बांगलादेश आणि म्यानमार या देशांतून अवैधपणे भारतात स्थलांतरित होणार्‍यांचा महापूर आला आहे. या सर्वांना स्थानिक जिहादी घटकांनी अवैधपणे आधारकार्ड, पारपत्र इत्यादी पुरवून सुरक्षित करण्यासाठी साहाय्य केले आहे. आपल्या समाजासाठी हा एक प्रचंड धोका आहे. भारतीय आणि परदेशी शक्तींसह, केंद्र, तसेच राज्य विधीमंडळांमध्ये निवडून येऊन प्रवेश करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

४. स्वतःच्या उद्दिष्टासाठी राष्ट्रविरोधी घटकांनी शासनाच्या सर्व स्तरांना लक्ष्य करणे

या राष्ट्रविरोधी घटकांचे कुटिल कारस्थान स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांच्या ‘टूलकिट’मध्ये (विरोधकांच्या प्रणालीमध्ये) निवडून आलेल्या संस्था, सरकारे, संरक्षण आणि सुरक्षा दले अन् सर्व सार्वजनिक संस्था यांवरील जनतेचा विश्वास डळमळीत करण्याची योजना स्पष्टपणे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते निवडून आलेले प्रतिनिधी, सरकारांचे प्रमुख, संरक्षण आणि सुरक्षा दल अन् सार्वजनिक संस्था यांना लक्ष्य करतात. अभूतपूर्व संख्येने बाँबच्या धमक्या देणे, रेल्वे अपघात घडवून आणण्यासह अनेक विध्वंसक कृत्ये, उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालये यांमध्ये जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात वाढ अन् या सर्व शाखांमध्ये उच्च प्रतिष्ठित पदांवर असलेल्या मान्यवरांवर आक्षेप घेणे, हे सर्व व्यापक कुटिल कारस्थानाचे भाग आहेत.

५. भारतातील अत्यंत धोकादायक स्थितीवर उपाय म्हणजे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे !

अशा धोकादायक परिस्थितीसाठी रामबाण उपाय, म्हणजे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले हिंदु राष्ट्र आहे. उगीच टाळाटाळ करण्यापेक्षा अधिकृतपणे ‘भारत म्हणजे हिंदु राष्ट्र’, या घोषणेवर सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे. मुसलमान मतपेढीवर टिकून राहिलेले जिहादी घटक आणि परजीवी हे हिंसाचारात गुंतलेले असतील हे खरे आहे; परंतु विशाल हिंदु बहुसंख्यांकांच्या मनापासूनच्या पाठिंब्याने आणि संरक्षण अन् सुरक्षा दल यांच्या शस्त्रशक्तीच्या बळावर सरकार अशा राष्ट्रविरोधी घटकांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असले पाहिजे. पुढे होऊन कारवाई करण्याची हीच योग्य वेळ आहे; कारण सध्या ५७ इस्लामी देशांचा समूह स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. यासाठी ज्यांनी जिहादींचे जीवन भयावह केले आहे, अशा इस्रायल, अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांचे आभार मानले पाहिजेत. यामुळे जातीय धर्मांधांना स्वतःला वाचवण्यासाठी एकटे सोडले जाईल आणि परिणामी जीवित अन् मालमत्ता यांचे न्यूनतम हानी होईल.

– अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा.