
१. टिचभर पोटात अन्न पचवून रक्त आणि वीर्य बनवणारा परमात्मा !
‘विज्ञान कितीही प्रगत झाले, तरी त्याला परमात्म्यावर मात करता यायची नाही. विज्ञानाला वीर्य निर्माण करता येते का ? स्त्रीबीज, रेत बनवता येते का ? अन्न खातो. टिचभर पोटात अन्नाचे रक्तात रूपांतर होते. विज्ञान रक्त बनवू शकते का ? अन्नाचे रक्त, मांस, मज्जा इत्यादी सप्तधातू विज्ञान बनवू शकेल का ? आणि तसा प्रयोग करायचा झाला, तर प्रचंड मोठी प्रयोगशाळा (लॅबॉरेटरी) लागेल. असंख्य वैज्ञानिक लागतील. शतशः कामगार लागतील. कोट्यवधी रुपये खर्ची पडतील आणि ‘इतके करूनही यश मिळेलच’, याची निश्चिती नाही. टिचभर पोटात परमात्मा अन्न पचवतो. तोच रक्त, वीर्य बनवण्याचे काम करतो !
२. विज्ञानाद्वारे आत्मशक्ती निर्माण करणे अशक्य !
स्त्री-पुरुषांचा यंत्रासारखा (मशीनसारखा) उपयोग करून योगी बनवता येईल का ? जन्माला येणार्या मुलात योग्याचा अंतरात्मा (Inner spirit), ती संकल्पशक्ती आणि आत्मशक्ती कशी निर्माण कराल ?’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’,डिसेंबर २०१९)