अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे आध्यात्मिक सुविचार

आज अक्कलकोट येथील स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !

श्री स्वामी समर्थ

१. एकदा स्वामींना विचारले, ‘‘तुमच्या देवांचे नाव काय ?’’ ते म्हणाले, ‘‘आमच्या देवास ‘नृसिंहसरस्वती’ म्हणतात. माझे नाव ‘नृसिंहभान’ आहे.’’

२. तुझ्या मनात कांक्षा आली. आम्ही तुझ्या घरी जेवत नाही.

३. तुझे मोठेपण तुझ्या घरात, येथे मोठेपण कशास पाहिजे ? असे राजे आम्ही पुष्कळ बनवतो.

४. उतावळा सो बावळा, धीर सो गंभीर ।

५. आमची नोकरी कर, म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील आणि तुझे गाठोडे आम्हास दे.