हिंदूंचे संघटन ‘हिंदु राष्ट्र’ उभारणार !

हिंदु राष्ट्र-निर्मितीची संकल्पना गुरुदेवांनी मांडली ।
हिंदुत्वनिष्ठांना कार्य करण्याची प्रेरणा अन् शक्ती मिळाली ।। १ ।।

हिंदु राष्ट्र-निर्मितीचे स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवर कार्य चालू जाहले ।
गुरुदेवांच्या माध्यमातून हिंदूंना कुणी वाली असल्याचे जाणवले ।। २ ।।

विस्कटलेल्या हिंदुत्वनिष्ठांचे संघटन उभे राहिले ।
हिंदु अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदूंना एक व्यासपीठ लाभले ।। ३ ।।

हिंदु संघटनांचा हुंकार हिंदुत्वाविषयी हिंदूंचे तेज जागवतो ।
जणू विश्व पादाक्रांत करण्यास हिंदुत्वनिष्ठांना बळ देतो ।। ४ ।।

चला हिंदूंनो, विष्णुस्वरूप गुरुदेवांच्या संकल्पनेने भारित होऊ ।
तन-मन अर्पण करून हिंदु राष्ट्र अवतरण्या कार्यरत होऊ ।। ५ ।।

पुढील पिढ्यांच्या भविष्याचा मार्ग उज्ज्वल सारेजण करू ।
भारतभूमी म्हणजे हिंदूंची भूमी असा जयघोष आसमंतात करू ।। ६ ।।

– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४४ वर्षे), सनातन आश्रम, गोवा. (२२.६.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक