याच हार्दिक शुभेच्छा प्रति राष्ट्रभक्त बांधवा ।

चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथीला ।
मंगल गुढीपाडवा ।।

श्री. दत्तात्रय पटवर्धन

नववर्षारंभ म्हणूनी ।
असा साजरा व्हावा ।। १ ।।

कोटी कोटींनी धरावा हिंदु राष्ट्र ध्यास ।
नष्ट करूनी सारे विकल्प ।।

हिंदु राष्ट्र स्थापण्याचा ।
करू समष्टी दृढ संकल्प ।। २ ।।

लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ।
तथा वंदनीय हेडगेवार, गुरुजी गोळवलकर ।।

तथा धर्मवीर, क्रांतीवीर, राष्ट्रसंत थोर ।
सांप्रतचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेही आतूर ।। ३ ।।

गुरुकृपायोगाची करू साधना ।
करू गुरुचरणी विनम्र प्रार्थना ।।

मंगल गुढी उभारतांना ।
होऊ दे सत्वर हिंदु राष्ट्र स्थापना ।। ४ ।।

हे देवा, श्री गुरुदेवा ।
हाच आमुचा गुढीपाडवा ।।

अन् याच हार्दिक शुभेच्छा ।
प्रति राष्ट्रभक्त बांधवा ।। ५ ।।

– श्री. दत्तात्रय पटवर्धन, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (१६.३.२०२५)