परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी आणि ‘साधकांचा उद्धार व्हावा’, यासाठी सातत्याने प्रयत्न करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘सप्टेंबर २०१९ मध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तू तुझ्या कुटुंबियांना घेऊन रामनाथी आश्रमात कधी येणार ? लवकर घेऊन ये. प.पू. डॉक्टरांची कृपादृष्टी त्यांच्यावर पडल्यावर त्यांचा उद्धार होईल. त्यासाठी तू नियोजन कर आणि काही साहाय्य लागले, तर सांग. आपण गाडीचीही व्यवस्था करूया.’’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. कुटुंबियांना रामनाथी आश्रमात घेऊन येण्याचे नियोजन करायला २०२२ चे वर्ष उजाडणे

श्री. शंकर नरुटे

मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्यानुसार ‘कुटुंबियांना रामनाथी आश्रम दाखवण्याचे नियोजन करूया’, असे ठरवले; पण सेवांचे प्राधान्य आणि अन्य काही गोष्टी यांमुळे नियोजन करणे पुढे पुढे जात होते. शेवटी मार्च २०२२ मध्ये मी कुटुंबियांना रामनाथी आश्रम दाखवण्यासाठी घेऊन गेलो.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आबा (साधकाचे वडील) संत आहेत’, असे सांगून त्यांचा सन्मान सोहळा करायला सांगणे

१३.३.२०२२ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी ‘आबा (माझे वडील श्री. राजाराम भाऊ नरुटे, वय ९० वर्षे) संत आहेत’, असे सांगून त्यांचा सन्मान सोहळा करायला सांगितला. त्याप्रमाणे १४.३.२०२२ या दिवशी त्यांचा संतसन्मान सोहळा झाला.

३. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ कुटुंबियांना आश्रमात बोलवायला का सांगत होत्या’, याचा उलगडा होणे

मागील काही वर्षांपासून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मला ‘कुटुंबियांना आश्रमात बोलव’, असे का सांगत होत्या’, याचा उलगडा झाला. पूर्वीच्या काळी, म्हणजे द्वापरयुगापर्यंत भविष्यकाळात घडणार्‍या घटना आकाशवाणी होऊन वर्तवल्या जायच्या, त्याप्रमाणे ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ही आकाशवाणी करून कुटुंबियांचा उद्धार करण्यासाठी केलेला संकल्प फलित झाला’, असे मला वाटले.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

अ. ‘प.पू. डॉक्टरांची कृपादृष्टी प्रत्येक जिवावर व्हावी’, अशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना तळमळ आहे.

आ. आम्हा सामान्य साधकांना गुरुदेव काही अंशीच कळले आहेत. ‘प.पू. डॉक्टर सर्वांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीतलावर आले आहेत’, याची जगाला ओळख करून देण्यासाठी आणि ‘गुरुदेवांनी सांगितलेली साधना कशी करायला हवी ?’, यासाठी त्या सातत्याने मार्गदर्शन करतात.

इ. ‘कुठला जीव कुठल्या कारणामुळे कुठे थांबला आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या स्वतःहून त्या साधकाला बोलावून त्याला साधनेची योग्य दिशा देतात.

ई. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे साधकांच्या साधनेतील सर्व अडथळे दूर होतात. त्यांच्या ५ – १० मिनिटांच्या भेटीतूनही साधनेसाठी योग्य दिशा मिळते आणि त्या दिशेने साधक आपोआप वाटचाल करू लागतो.

उ. ‘साधकांनी मनात केलेली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचते आणि दुसर्‍या दिवशी त्या साधकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे प्रश्न न विचारताच देतात’, अशी अनुभूती बर्‍याच वेळा साधकांना येते.

ऊ. ‘प्रत्येक जिवाची आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि त्याचा उद्धार व्हावा’, हाच या गुरुमाऊलीला (श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना) ध्यास आहे आणि त्यानुसार अनेक साधकांचा उद्धार होत आहे.

५. प्रार्थना

भगवंताचे (गुरुदेवांचे) कार्य सिद्धीस नेणार्‍या या गुरुमाऊलीला (श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना) शतशः नमन ! ‘हे गुरुमाऊली, आमच्या उद्धारासाठी तू या जगात अवतरली आहेस’, याची जाणीव आम्हाला सदैव राहू दे. आमच्याकडून तुला

अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न होऊन देत’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे !’

– श्री. शंकर राजाराम नरूटे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.८.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक