एम्.आय.एम्.चे प्रवक्ते महंमद फरहान यांनी कुराणचा अवमान झाल्यावरून प्रविष्ट केला खटला
नवी देहली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांना नुकतेच कुत्र्याचे एक पिल्लू भेट दिले होते. या पिल्लाचे नाव ‘नूरी’ असे ठेवण्यात आले. पिल्लाला ‘नूरी’ नाव दिल्याने मुसलमानांकडून विरोध करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील एम्.आय.एम्.चे प्रवक्ते महंमद फरहान यांनी न्यायालयात खटला प्रविष्ट केला आहे. यावर ८ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
(सौजन्य : News 18 Bihar Jharkhand)
फरहान यांच्या अधिवक्त्यांनी संगितले की, ‘नूरी’ शब्द इस्लामशी संबंधित आहे. ‘नूरी’ शब्दाचा उल्लेख कुराणमध्ये आहे. मुसलमान मुलींचे नावही नूरी ठेवले जाते. त्यामुळे ‘राहुल गांधी यांनी नाव पालटावे आणि क्षमा मागावी’, असे सांगितले होते; मात्र त्यांनी तसे केले नाही. राहुल गांधी यांनी आमच्या मुली, वृद्ध आणि महंमद पैगंबर यांचा अवमान केला आहे. इस्लामची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत कोणत्याही मुसलमान कुटुंबाने कोणत्याही प्राण्याचे नाव ‘नूरी’ असे ठेवलेले नाही.
संपादकीय भूमिकामुसलमान त्यांच्या धर्माच्या अवमानाविषयी किती संवेदनशील असतात आणि लगेच त्याचा विरोध करतात, हेच यातून दिसून येते. बहुतांश हिंदू मात्र त्यांच्या धर्माविषयी असंवेदनशील असतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! |