हिंदु जनजागृती समितीची स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !
सांगली – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन आणि पोलीस यांना ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले.
१. ईश्वरपूर येथे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी उद्योजक श्री. दीपक पटेल, हिंदुत्वनिष्ठ श्री. ललीत, धर्मप्रेमी श्री. अशोक मस्कर उपस्थित होते.
२. ईश्वरपूर येथील जनता महाविद्यालय, महादेवनगर, ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल, दा.ल. रामनामे प्राथमिक विद्यालय, आदर्श बालक मंदिर, जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ आणि क्रमांक ६ येथे निवेदने देण्यात आले.
सर्वच शाळा-महाविद्यालयांनी समितीचा उपक्रम योग्य असल्याचे सांगून या संदर्भात ‘राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना देऊ’, असे सांगितले. या वेळी धर्मप्रेमी सौ. समिधा खोत, सौ. प्राजक्ता खोत, श्रद्धा वाळवेकर, सरोजिनी मकोटे उपस्थित होत्या.
३. बत्तीसशिराळा येथे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना, तसेच विविध प्राथमिक शाळांमध्ये निवेदन देण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कु. स्नेहल मिरजकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद नायकवडी, धर्मप्रेमी श्री. अशोक मस्कर, श्री. मानेसर यांसह अन्य उपस्थित होते.
४. बोरगाव येथे पी.आर्.पाटील शाळा आणि कन्या शाळा येथे निवेदन देण्यात आले.
५. कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) येथे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ अमृत चोपडे, विनायक चव्हाण, सार्थक भोपे, यश चौगुले, नंदकिशोर बुरुड उपस्थित होते.
शिरोळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी कुरुंदवाड येथील धर्मप्रेमी सर्वश्री मंदार पाटुकले, शिवतेज चुडमुंगे, विनय चव्हाण, मयुर बुरुड, यश खाडे उपस्थित होते.
विशेष
१. ईश्वरपूर येथे धर्मप्रेमींनी विविध फलकांवर लिखाण करून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी जागृती केली.
२. सर्वच ठिकाणी निवेदन देण्यात हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी यांचा पुढाकार होता.
३. निवेदन स्वीकारल्यावर सर्वांनीच प्रतिक्रिया दिली की, हिंदु जनजागृती समिती चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. या कार्यामुळेच राष्ट्रध्वजाचे होणारे विडंबन थांबले आहे. पूर्वी हे ध्वज कुठेही पडलेले दिसायचे. आता केवळ समितीमुळे त्यांचा योग्य तो सन्मान राखला जातो.