वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील उद्योगपती श्री. रवीशंकर झुनझुनवाला यांचा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला.
या वेळी मनोगत व्यक्त करतांना श्री. रवीशंकर झुनझुनवाला म्हणाले,
‘‘मी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याशी जोडलो गेलो, ही माझ्यावरील भगवंताची कृपा आहे. श्री भगवतीदेवीच माझ्याकडून सेवा करवून घेत आहे. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला उपस्थित राहून पुष्कळ चांगले वाटले. येथे पुष्कळ ऊर्जा मिळत आहे.’’
झारखंड – येथील सेवाभारती ‘एकल ग्रामोत्थान फाऊंडेशन’चे विश्वस्त आणि विश्व हिंदु परिषदेचे झारखंड उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत यांचा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला.
श्री. चंद्रकांत रायपत म्हणाले,
‘‘छोट्या-मोठ्या सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन धर्मकार्य करायला हवे. हिंदूंनी आपल्या पाल्यांना संस्कारित करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंमध्ये वीररस निर्माण होण्याची आवश्यकता आहे.’’