‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ पुस्‍तकाचा पुणे येथे प्रकाशन सोहळा !

नास्‍तिकतावाद्यांच्‍या हत्‍येच्‍या भरकटलेल्‍या अन्‍वेषणाची पोलखोल !

पुणे, ५ मे (वार्ता.) – मागील काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम्.एम्. कलबुर्गी या नास्‍तिकतावाद्यांच्‍या हत्‍या झाल्‍या. या चारही प्रकरणांत अन्‍वेषण यंत्रणांनी ज्‍या प्रकारे अन्‍वेषण केले, त्‍यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हे अन्‍वेषण भरकटले होते. यामध्‍ये काही हिंदुत्‍वनिष्‍ठांना कारागृहात डांबण्‍यात आले; मात्र इतक्‍या वर्षांत यांतील एकाही हत्‍येच्‍या अंतिम निष्‍कर्षापर्यंत अन्‍वेषण यंत्रणा पोचू शकलेली नाही. उलट वारंवार पालटणार्‍या अन्‍वेषणामुळे या हत्‍यांचे अन्‍वेषण पुरते भरकटले.

न्‍यायालयानेच अनेकदा भरकटलेल्‍या अन्‍वेषणाविषयी तपासयंत्रणांवर ताशेरे ओढले. या हत्‍यांनंतर हिंदुत्‍वनिष्‍ठांचे अटकसत्र, भरकटून टाकण्‍यात आलेले अन्‍वेषण यांविषयी आतापर्यंत उजेडात न आलेल्‍या तथ्‍यांवर सुप्रसिद्ध डॉ. अमित थडानी यांनी वस्‍तूनिष्‍ठ, निष्‍पक्षपाती आणि सडेतोड लिखाण केले आहे.

(डावीकडून ) श्री. विद्याधर नारगोलकर, डॉ. अमित थडानी,  लेखिका शेफाली वैद्य

त्‍यांच्‍या ‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ या पुस्‍तकाचे प्रकाशन ५ मे या दिवशी पुणे येथे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते झाले.

या सोहळ्‍याला लेखिका शेफाली वैद्य, स्‍वातंत्र्यवीर सावरकर स्‍मृती प्रतिष्‍ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे मान्‍यवर उपस्‍थित होते.

 अ‍ॅमेझॉन’च्या पुढील लिंकवर पुस्‍तक ऑनलाईन उपलब्ध :
https://amzn.eu/d/3lmvnlh