(म्हणे) ‘जोपर्यंत जम्मू-काश्मीरला न्याय मिळत नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंच्या हत्या होतच रहाणार !’ – फारूख अब्दुल्ला

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला

जम्मू – जोपर्यंत जम्मू-काश्मीरला न्याय मिळत नाही; तोपर्यंत काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले जाईल. ते थांबणार नाही. पूर्वी हे लोक म्हणायचे की, हा प्रकार कलम ३७० असल्याने होत आहे; मात्र आता कलम ३७० संपुष्टात येऊन ३ वर्षे झाली आहेत. तरीदेखील लक्ष्यित हिंसा का थांबत नाहीत ?, असा प्रश्‍न जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी विचारला. ते येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते.

संपादकीय भूमिका

काश्मीरमधील हिंदूंना वंशसंहार करणे, हेच जिहादी आतंकवादी आणि काश्मीरमधील जिहादी यांचे लक्ष्य आहे. त्यातूनच ते हिंदूंना गेली ३० वर्षे लक्ष्य करत आहेत. तरीही त्यावरील लक्ष हटवून वेगळेच सूत्र उपस्थित करण्याचा प्रयत्न अब्दुल्ला यांच्यासारखे काश्मिरी मुसलमान नेते करत आहेत, हेच यातून लक्षात येते !