हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतरची धर्मप्रेमींची ‘ऑनलाईन’ बैठक

वाराणसी – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केवळ जागृती नाही, तर साधनेने आध्यात्मिक बळ प्राप्त करून हिंदूंचे प्रभावी संघटन केले पाहिजे. पांडव संख्येने अल्प होते; परंतु त्यांच्या मागे साक्षात् भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे त्यांचा विजय झाला. त्याप्रमाणे आपल्यालाही ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.

पू. नीलेश सिंगबाळ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ फेब्रुवारी या दिवशी हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली. या सभेनंतर उत्तरप्रदेश, बिहार आणि ओडिशा राज्यांतील धर्मप्रेमींची नुकतीच ‘ऑनलाईन’ बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये ते मार्गदर्शन करत होते. प्रारंभी समितीच्या यशस्वी धर्मकार्याची माहिती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी दिली. समितीच्या प्रमुख उपक्रमांची माहिती समितीचे श्री. राजन केसरी यांनी दिली. या वेळी सर्व धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याचा निर्धार केला. बैठकीनंतर उपस्थित धर्मप्रेमींनी धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली. या बैठकीत १०३ धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.

क्षणचित्रे

१. धर्मप्रेमींची एक साप्ताहिक बैठक घेण्याचे ठरले.

२. या वेळी हिंदु राष्ट्रासाठी काय करायला पाहिजे ? याविषयी उपस्थित धर्मप्रेमींनी स्वत:हून विचारणा केली.

३. अनेक धर्मप्रेमींनी सभेचे कौतुक केले आणि अशा प्रकारची सभा परत परत व्हायला पाहिजे, असे सांगितले.