तृणमूलचा विजय झाल्यास मौलाना आणि इमाम यांचे मानधन वाढवू !

तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांचे मशिदीमधून आश्‍वासन

  • निवडणूक आचारसंहितेनुसार मंदिर, मशीद, चर्च आदी धार्मिक स्थळांचा वापर प्रसारासाठी करता येत नसतांना तृणमूल काँग्रेसचे मंत्री थेट असे आश्‍वासन देतात, हे पहाता निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !
  • हिंदुत्वाच्या नावावर मते मागितल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ६ वर्षे मतदान करण्यास बंदी घालण्यात आली; मात्र धर्मांधांवर कधीही अशी कारवाई होत नाही, हे लक्षात घ्या !
  • हिंदु नेते कधी ‘पुरोहित, पुजारी यांना मानधन देऊ’ किंवा ‘असलेले मानधन वाढवू’, असे आश्‍वासन देत नाहीत; कारण ते मतपेढी नाहीत, हे लक्षात घेऊन हिंदूंनी त्यांची मतपेढी निर्माण केली पाहिजे !
ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम

कोलकाता – जर राज्यात पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार आले, तर इमाम आणि मौलवी यांचे मानधन वाढवण्यात येईल, असे आश्‍वासन तृणूमल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांनी एका मशिदीमध्ये निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी दिले.

या वेळी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने ‘आचारसंहिता लागू असतांना तुम्ही असे आश्‍वासन कसे देऊ शकता ?’ असा प्रश्‍न विचारला. त्या वेळी हाकिम यांनी यावर उत्तर देण्याचे टाळत, ‘मी कुठलेही आश्‍वासन दिलेले नाही’, असे सांगितले. हाकिम यांच्या या विधानानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.