हिंदूंवर धर्मांतरासाठी अमानुष अत्याचार करणार्या धर्मांधांचेे क्रौर्य जाणा !
२३ फेब्रुवारी १९८१ चा दिवस ! तमिळनाडूच्या मीनाक्षीपूरम् येथे डॉ. नसरुद्दीन कमाल आणि त्यांच्या सहकार्यांनी दलित असलेल्या एका हिंदु कुटुंबाला बंधक बनवले. त्या घरातील सर्व सदस्यांनी इस्लाम स्वीकारला होता. त्या घरातीलच नाही, तर त्या भागातील अनुमाने १ सहस्र दलित धर्मांतरित होऊन मुसलमान बनले होते. त्यामुळे मीनाक्षीपूरम्चे नाव पालटून रहमतनगर करण्यात आले.
धर्मांतरित न होण्याविषयी निर्भयपणे उत्तर देणारी ८ वर्षांची वैदेही !
या हिंदु कुटुंबात ८ वर्षांची वैदेही होती. ती कोणत्याही परिस्थितीत इस्लाम स्वीकारण्यास सिद्ध नव्हती. तिने सांगितले, मी मरण पत्करीन; पण कलमा वाचणार नाही. ती तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, तुम्हीच तर मला गायत्री मंत्र शिकवला होता. तुम्हीच म्हणाला होता की, ही परमेश्वराची वाणी आणि हा मंत्र वेदांमधील सर्वांत सुंदर आहे. यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. मग मी त्या लोकांच्या कलमा कशी वाचू शकते ? त्यांनी माझ्या वर्गमैत्रिणींना ठार मारले; कारण त्यांनीही इस्लाम स्वीकारला नव्हता. आपण असा धर्म कसा स्वीकारू शकतो, ज्याला न स्वीकारल्याने ठार मारण्याचे भय असेल ? मला तर गायत्री मंत्र प्रिय आहे, जो मला निर्भय बनवतो.
तिच्या बाबांनी शेवटचा प्रयत्न म्हणून तिला सांगितले, मुली, जीवन राहिले, तरच धर्म रहाणार ना ? हट्ट सोड आणि इस्लाम स्वीकार. यावर वैदेहीने म्हटले, बाबा, तुम्ही एक दिवस मला सांगितले होते की, गुरु गोविंदसिंह यांची दोन मुले भिंतीत पुरण्यात आली; पण त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही. मग मी त्या शीख बंधूंची लहान मुलगी नाही का ? जेव्हा ते धर्मापासून लांब गेले नाही, तर मी कशी जाऊ शकते ?
क्रूर मौलवीने वैदेहीशी केलेल्या क्रौर्याची परिसीमा आणि तिने अनंत यातना सहन करत धर्मासाठी केलेले प्राणार्पण !
वैदेही इस्लाम स्वीकारण्यास नकार देत असल्याचे पाहून डॉ. नसरुद्दीन कमाल यांच्यासमवेत उभे असणार्या मौलवी नरुद्दीन खान याने दोन टके की लडकी, कलमा वाचण्यास नकार देते ? असे म्हणत त्याने वैदेहीचे केस पकडून चुलीवरील उकळत्या पाण्यात तिचे तोंड बुडवले. तिच्या चेहर्यावरील मास निघाले होते. एकदाच तोंड बुडल्यावर तिने टाहो फोडला, देवा मला वाचव. मौलवी म्हणाला, तुझा दगडाचा देव तुला वाचवायला येणार नाही. आता तरी इस्लाम स्वीकार. नाही तर तुला या उकळत्या पाण्यात बुडवण्यात येईल. तिचे बाबा म्हणाले, बेटी, इस्लाम स्वीकार कर. आम्ही पण मुसलमान बनलो आहोत. तू जिवंत राहिली, तर तुझ्या आधारे माझे म्हातारपण जाईल.
क्रूर मौलवीने चुलीजवळचे तिखट तिच्या डोळ्यांत कोंबून ते चेहर्यावर फासले. पुन्हा एकदा वैदही तळमळली. आताही ती निर्भयपणे म्हणाली, मी इस्लाम स्वीकारणार नाही. मौलवीला आणखी क्रोध आला. त्याने वैदहीचे डोके थेट चुलीत घातले. त्यानंतर वैदेहीचे प्राण सोडतांनाही तिच्या तोंडून हेच निघत होते, मी इस्लाम स्वीकारणार नाही. तिने शेवटच्या क्षणी आशेने डॉ. कमाल यांच्याकडे पाहिले आणि म्हणाली, माझा धर्म वाचवा, डॉक्टरसाहेब ! दगडाचे देव येणार नाहीत, आजपासून मी तुला ईश्वर मानले.
असाहाय्य मुलीचा धर्माप्रती असलेला दृढ निश्चय पाहून डॉ. नसरुद्दीन कमाल यांचे हृदय पिळवटून निघणे आणि त्यांनी हिंदु धर्म स्वीकारणे !
वैदेहीचे आता काही शेष राहिले नव्हते. डॉ. नसरुद्दीन कमाल धर्मांतर करणार्या गटात सहभागी होता; परंतु ठाऊक नाही, वैदेहीने त्यांच्यात काय पाहिले. ती अधर्मीलाच धर्म वाचवण्याची विनंती करून बसली होती. त्या असाहाय्य मुलीचा धर्माप्रती असलेला दृढ निश्चय पाहून डॉ. नसरुद्दीन कमाल यांचे हृदय पिळवटून निघाले आणि ते म्हणाले, या अल्ला, अशा धर्माच्या ठेकेदारांपेक्षा मरण आलेले बरे ! ते त्वरित घरी गेले. डॉ. कमाल काहीही न खाता-पिता सतत १० दिवस घरातच पडून राहिले. त्यांच्या डोळ्यांसमोर केवळ वैदेहीच दिसत होती. त्यांनी गायत्री मंत्राचा अर्थ समजून घेण्यासाठी सत्यार्थ प्रकाश नावाचे पुस्तक खरेदी केले. त्यांनी त्याचे सखोल अध्ययन केले. ११ नोव्हेंबर १९८१ या दिवशी डॉ. कमाल यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह एका जनसमुदायासमोर विश्व हिंदु परिषद आणि आर्य समाज यांच्याकडून वैदिक (हिंदु) धर्म स्वीकारला. डॉ. कमाल यांनी आता स्वतःचे नाव मित्रजीवन, पत्नीचे नाव बेगम नुसरत जहाँ ऐवजी श्रद्धादेवी, तसेच ३ मुली शमीम, शबनम आणि शौरीन यांची नावे क्रमश: आम्रपाली, अर्चना अन् अपराजिता ठेवले.
आचार्य मित्रजीवन यांनी उर्वरित जीवन वेदांचा प्रचार-प्रसार करणे
१५ नोव्हेंबर १९८१ या दिवशी आर्य समाज, सांताक्रूझ, मुंबई येथे त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. तेथे त्यांनी एकच सांगितले, मी वैदेहीला तर परत आणू शकत नाही; परंतु हिंदु समाजाला माझी विनंती आहे की, माझ्या मुलींचा त्यांनी स्वीकार करावा. त्या हिंदु कुटुंबातील सुना झाल्या, तर मी प्रायश्चित्त केले, असे मला वाटेल. जे माझ्या डोळ्यांसमोर घडले, ते मी जरी केेले नसेल, तरी त्याला मीही दोषी आहेे; कारण माझ्या डोळ्यांसमोर एका निरागस मुलीची हत्या करण्यात आली.
आचार्य मित्रजीवन यांनी त्याचे उर्वरित जीवन वेदांच्या प्रचार-प्रसारासाठी घालवले. त्यामुळे त्यांना आज अनेक लोक ओळखतात, त्यांची पुस्तके वाचतात; परंतु फार अल्प लोकांना ठाऊक आहे की, ते जन्माने मुसलमान होते आणि हे तर कुणाला माहीतच नाही की, वैदेही कोण होती ?
(साभार : वेद वृक्ष की छाया तले या पुस्तकातील एक अंश, लेखिका : फरहाना ताज; इंडियन एक्सप्रेस, २४ फेब्रुवारी १९८१; मासिक वैदिक गर्जना, वर्ष १९८२)