देहलीतील हनुमान मंदिर अवैध ठरवून प्रशासनाने पाडले !

विहिंपचा विरोध !

देहलीतील आम आदमी सरकारमध्ये अवैध मदरसे, मशिदी, मजार आदी पाडण्याचे धाडस आहे का ?

नवी देहली – येथील चांदणी चौकातील हनुमान मंदिर देहली सरकारच्या प्रशासनाकडून अनधिकृत ठरवून पाडण्यात आले. याला विश्‍व हिंदु परिषदेने विरोध केला आहे. विहिंपचे प्रवक्ते विनोद बंसल यांनी म्हटले, ‘या अत्यंत लज्जास्पद घटनेने औरंगजेबी शासनाची आठवण झाली.

गेल्या दीड मासापासून सरकारकडे मंदिराचे रक्षण करण्याची मागणी केली जात होती; मात्र प्रशासनाने शेवटी ते पाडले.

(सौजन्य : Punjab Kesari TV)

(वरील छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

मंदिर पाडू नये; म्हणून सरकारने न्यायालयात याचिका केली नाही आणि विहिंपशी चर्चा करण्यासाठीही वेळ दिला नाही.’ ‘हिंदु समाजाविषयी हा भेदभाव आणि दुरावा कधीपर्यंत चालू रहाणार ?’, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.