संपूर्ण देशात प्रदूषणात वाढ होत असल्याने स्थानांतर कुठे करायचे ?, असा प्रश्न पडल्यास आश्चर्य ते काय ? या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवायला अतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील ग्रामीण भागात शाळेच्या जवळ असणार्या रासायनिक आस्थापनांमुळे निर्माण होणार्या वाढत्या प्रदूषणामुळे सरकारी शाळेतील ७ शिक्षकांनी त्यांचे स्थानांतर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
बढ़ते प्रदूषण और जहरीले धुएं से परेशान होकर मेरठ में शिक्षकों ने मांगा तबादला, शिक्षा विभाग में मचा हड़कंप https://t.co/LB5B4dtOUf #meerut #teachers #uttarpradesh #uttarpradeshnews
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) December 26, 2020
या प्रदूषणामुळे त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांनी ही मागणी केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने प्रदूषणाचा अहवाल मागवला आहे. रजपुरा ब्लॉक येथील प्राथमिक विद्यालय बहचौलातील शिक्षिका सीमा रस्तोगी यांनी पत्र पाठवून स्थानांतर करण्याची मागणी केली आहे.