|
कोल्हापूर, २० डिसेंबर (वार्ता.) – प्रेमळ, शांत स्वभाव आणि दृढ श्रद्धा यांमुळे कोल्हापूर येथील श्रीमती शैलजा शिवराम दीक्षित (वय ८१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे १६ डिसेंबर या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी संगणकीय प्रणालीद्वारे घोषित केले. या वेळी श्रीमती शैलजा शिवराम दीक्षित यांचे दिवंगत पती कै. शिवराम दीक्षित यांनीही ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घोषित केले. एकाच वेळी पत्नीने ६१ टक्के आणि त्यांचे दिवंगत पती यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याद्वारे श्रीकृष्णाने सर्वांना अवर्णनीय आनंदाच्या भावसागरात डुंबवले.
श्रीमती शैलजा दीक्षित या सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या साधिका सौ. अंजली यशवंत कणगलेकर यांच्या काकू आहेत. ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या साधिका सौ. जयश्री कडोलकर यांनी श्रीमती दीक्षित यांना श्रीकृष्णाची प्रतिमा आणि खाऊ दिला.
या वेळी श्रीमती शैलजा यांचा मुलगा श्री. शेखर शिवराम दीक्षित, सून सौ. सुधा, धाकटी मुलगी सौ. श्रद्धा चिप्पलकट्टी, त्यांची मुलगी कु. मुक्ता, मधल्या मुलीची मुलगी कु. श्रुती हे उपस्थित होते. सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातून सौ. अंजली कणगलेकर आणि श्री. सत्यकाम कणगलेकर, बेळगाव येथून श्री. यशवंत कणगलेकर, डॉ. अंजेश कणगलेकर, श्रीमती शैलजा दीक्षित यांच्या जाऊ श्रीमती विजया दीक्षित, सौ. अनघा दीक्षित हे सर्वजण ऑनलाईनद्वारे या आनंदात सहभागी झाले.
उभयतांनी एकाच वेळी आध्यात्मिक पातळी गाठणे हे वैशिष्ट्यपूर्ण ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
श्रीमती शैलजा यांची नामजप आदी साधना चांगली चालू आहे. कै. शिवराम दीक्षित यांचीही मृत्यूपूर्वीची साधना चांगली होती आणि मृत्यूनंतरही त्यांची साधना चालू आहे. उभयतांनी एकाच वेळी अनुक्रमे ६१ टक्के आणि ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे, ही वैशिष्ट्यपूर्ण घटना असून यातून इतरांनाही पुष्कळ शिकण्यासारखे आहे.
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन करून सांगितले, ‘‘साधनेचा संस्कार आणि धर्माचरण यांमुळे कणगलेकर कुटुंब पूर्णकालीन साधना करत आहे. याच समवेत दीक्षित कुटुंबात संत निर्माण झाले आणि अन्य कुटुंबीय ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठत आहेत. यामुळे पुष्कळ आनंद वाटतो.’’
श्रीमती शैलजा दीक्षित मनोगत
मनोगत व्यक्त करतांना श्रीमती शैलजा दीक्षित म्हणाल्या, ‘‘मी पुष्कळ आनंदी असून काय बोलावे, ते सुचत नाही.’’ (भाव जागृत झाल्याने त्या अधिक बोलू शकल्या नाहीत.