९.१२.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे अन् ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. संदीप शिंदे यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. सौ. नंदिनी सुर्वे
१ अ. सतत सेवारत असणे : ‘संदीपदादा सेवेत सतत कार्यरत असतात. कुणीही कधीही त्यांना सेवेविषयी काहीही विचारू दे, ते लगेच त्यांना सहकार्य करतात. ते सर्व सेवा अविरतपणे करतात. ‘सेवा समर्पित भावाने आणि झोकून देऊन कशी करायची ?’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे संदीपदादा !’
२. सौ. अर्पिता पाठक
२ अ. सहजता : ‘संदीपदादाच्या वागण्यात सहजता आहे.
२ आ. तो सतत अंतर्मुख असतो.
२ इ. एखाद्या सूत्रात ‘आपली चूक आहे’, असे लक्षात आल्यावर तो ती प्रांजळपणे मांडतो आणि मनापासून चूक स्वीकारतो.
२ ई. अभ्यासू वृत्ती : सेवा करतांना काही सूत्रे त्याच्यासाठी नवीन असतात; पण ‘गुरुसेवा योग्य प्रकारे व्हावी’, यासाठी संदीपदादा तो विषय
शिकून घेतो.
२ उ. तत्त्वनिष्ठ : तो सेवेशी संबंधित साधकांच्या चुका योग्य आणि सुस्पष्ट शब्दांत सांगतो. त्यात कुठेही प्रतिमा जपणे किंवा भावनाशीलता नसते.’
३. श्री. महावीर श्रीश्रीमाळ
३ अ. हसतमुख : ‘संदीप नेहमी हसतमुख असतो.
३ आ. सहजता : संदीप सर्व वयोगटातील साधक, संत आणि सद्गुरु यांच्याशी सहजतेने अन् भावपूर्ण संवाद साधतो. त्याच्या मित्रांचे दूरभाष आल्यानंतर ते व्यवहारातील उच्च पदावर असले किंवा व्यावहारिक प्रगती केलेले असले, तरी तो त्यांच्याशी सहजतेने वागतो. तो सर्वांशी त्यांच्या प्रकृतीनुसार जवळीक साधतो.
३ इ. तो नेहमी स्थिर असतो. सेवेच्या प्रत्येक टप्प्यावर तो सतर्क आणि प्रसंगावधानी असतो.
३ ई. दृढ श्रद्धा : संदीपने पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ केल्यानंतर एका बिकट प्रसंगात श्री गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे तो स्थिर राहून प्रसंगाला सहज सामोरा गेला.
३ उ. भाव : प्रार्थना करतांना, तसेच संत आणि सद्गुरु यांच्या सान्निध्यात त्याच्यातील भाव जाणवतो.’
४. चि. ईश्वरी पाठक (वय ५ वर्षे) आणि कु. वैदेही सावंत (वय १० वर्षे)
‘संदीपमामा फार प्रेमळ आहेत. ते येथील सेवेतील साधकांची आणि आम्हा सर्वांची काळजी घेतात. ते सेवेतील साधकांना आणि आम्हा सर्वांना समजून घेतात. कधी कधी ते गंमतीही करतात. संदीपमामा आमचे पुष्कळ लाड करतात. ते सगळ्यांशी प्रेमाने बोलतात. ते सेवाही पुष्कळ मनापासून करतात.’
चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. श्री. अरुण कुलकर्णी
१ अ. ‘स्वातीताई स्थिर राहून सेवा करते.
१ आ. तत्त्वनिष्ठ : ती साधकांना भावनेच्या स्तरावर न हाताळता त्यांचे स्वभावदोष किंवा अहं यांच्या मुळाशी नेऊन त्यांना ‘साधनेत ते कुठे न्यून पडतात ?’, हे दाखवून देते.
१ इ. प्रत्येक प्रसंगाचा साधनेसाठी उपयोग करणे : स्वातीताईने वाढदिवसानिमित्त केलेला साधनेच्या संदर्भातील संकल्प सांगून ‘आतापर्यंत मी कुणाचे मन दुखावले असेल आणि माझ्याकडून चुका झाल्या असतील, तर मी त्यासाठी सर्वांची क्षमा मागते’, अशी क्षमायाचना केली. त्या वेळी ‘प्रत्येक प्रसंगाचा साधनेसाठी कसा उपयोग करायचा ?’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले.’
२. सौ. नंदिनी सुर्वे
२ अ. ‘स्वातीताई समोरील साधकाचे कुठलेही सूत्र व्यवस्थितपणे ऐकून घेतात आणि समोरील साधकाला योग्य तो प्रतिसाद देऊन निश्चिंत करतात.
२ आ. ‘संदीपदादा आणि स्वातीताई दोघेही गुरुकार्यासाठी समर्पित झालेले दोन जीव असून त्यांचा विवाह हा साधकांना गुरुमाऊलींनी दिलेला आनंदसोहळा आहे’, असेच वाटत आहे.’
३. सौ. तन्वी सरमळकर, सौ. प्रियांका राजहंस, कु. माधुरी दुसे, कु. मेघा चव्हाण आणि कु. मृण्मयी गांधी
अ. ‘दिसेल ते कर्तव्य’ याप्रमाणे करण्याचा स्वातीचा प्रयत्न असतो.
आ. स्वतःला पालटण्याची तळमळ
अ. आरंभी तिची प्रकृती अबोल होती; पण नंतर समष्टी सेवेच्या दृष्टीने तिने सर्वांशी बोलण्याचा आणि सर्वांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती भाववृद्धी सत्संग आणि आढावा घेणे, या सेवा चांगल्या प्रकारे करते.
आ. उत्तरदायी साधकांनी तिला चुका सांगितल्यावर आधी तिच्या मनात नकारात्मक विचार यायचे आणि तिचा काही वेळ त्यात जायचा; परंतु आता ती सकारात्मक अन् शिकण्याच्या स्थितीत रहाण्याचा प्रयत्न करते.
इ. शीघ्र कवयित्री
तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती बोलता बोलता कविता करते. तिच्या प्रत्येक कवितेत तिचा गुरूंप्रतीचा भाव आणि आर्तता उतरलेली असते.
ई. इतरांना साहाय्य करणे
तिच्याशी कधीही बोलायला गेल्यावर तिच्याशी मनमोकळेपणे सर्व प्रसंग बोलता येतात. ती प्रत्येक प्रसंगात तत्त्वनिष्ठ राहून ‘योग्य काय ?’, हे सांगून साहाय्य करते. त्यामुळे तिचा आधार वाटतो.
उ. अल्प अहं
साधक तिचे कौतुक करतात. तेव्हा ती स्वतःकडे कर्तेपणा कधीच घेत नाही. प्रत्येक गोष्टीचे कर्तेपण ती श्री गुरुचरणी अर्पण करते. विवाह ठरल्यानंतर तिला सहसाधिका जे सुचवत होत्या, त्यानुसार करण्याची तिची सिद्धता होती.
ऊ. भाव
तिला फुले पुष्कळ आवडतात. ‘आपणही असेच साधकपुष्प होऊन श्री गुरुचरणी अर्पण व्हावे’, असा तिचा भाव असतो. तिच्यातील भाव आणि चैतन्य यांमुळे तिच्या समवेत सेवा करतांना उत्साहाने सेवाही पूर्ण होते.’
४. चि. ईश्वरी पाठक आणि कु. वैदेही सावंत
‘स्वातीताई फार छान आहे. ती सगळ्यांचे लाड करते. ती सगळ्यांची आणि कृष्णाचीही लाडकी आहे.’
पहाता मूर्ती स्वातीताईची, आठवण येते मज संत मीरेची ।
पहाता मूर्ती स्वातीताईची, आठवण येते मज संत मीरेची ।
काय वर्णावी ताईची गुरुभक्ती, शब्दही अपुरे पडती ॥ १ ॥
शालिनतेचा शेला पांघरून, निघाली जी गृहस्थाश्रमी ।
सर्वांची मने जिंकूनी ती, जावो शीघ्र संतपदी (टीप)।
हीच प्रार्थना करितो आम्ही, आर्ततेने श्री गुरुचरणी ॥ २ ॥
– सौ. भाग्यश्री सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०२०)
‘इतरांच्या विवाहात ‘वैवाहिक जीवन सुखाचे जावो’, अशा शुभेच्छा व्यक्त करतात, तर साधिकेने ‘शीघ्र संतपदी’ जावो, अशी शुभेच्छा व्यक्त केली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणेगंध आहे फुलात, भाव आहे अंतःकरणात । हनुमान आहे रामाचा प्रिय भक्त । – कु. पूजा धुरी, साळगाव, कुडाळ. |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |