सिंधुदुर्ग – इयत्ता नववी ते अकरावीपर्यंतचे वर्ग चालू करण्यास, तसेच पूर्ण प्रवासी क्षमतेने एस्.टी.ची सेवा चालू करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे एस्.टी.चे कर्मचारी आणि माध्यमिक शिक्षक यांच्या कोरोनाशी संबधित चाचण्या जिल्हा अन् तालुका या स्तरांवर चालू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
इयत्ता नववी ते अकरावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून चालू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे शाळा चालू करतांना सर्व शिक्षकांची कोरोनाशी संबंधित चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली.