‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर सिद्ध करणार्‍या सद्गुरु (सौ.) सखदेवआजी !

आज असलेल्या सद्गुरु (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले
सद्गुरु (सौ.) आशालता सखदेव

वर्ष २०१५ मध्ये पू. सखदेवआजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतांना उपाय करण्यासाठी नामजप, न्यास आणि मुद्रा शोधत. त्या वेळी पू. आजींनी शोधलेले उत्तर आणि मी शोधलेले उत्तर ९० टक्के वेळा एकच असे. यावरून ‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर प्रकर्षाने सिद्ध होते. पू. आजींना त्या नामजपाचा लाभ होत असे. यावरूनही ‘अध्यात्म हे शास्त्र आहे’, हे पुन्हा एकदा सिद्ध होते.

तसे पाहिले, तर स्वतःला तीव्र त्रास होत असतांना उत्तर शोधणे कठीण असते, तरीही पू. आजी ते शोधू शकतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले