(म्हणे) ‘तुमची पिढी संपेल; मात्र हैद्राबादचे नाव भाग्यनगर होणार नाही !’ – असदुद्दीन ओवैसी यांची दर्पोक्ती  

अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, तर हैद्राबादचे भाग्यनगर का होऊ शकत नाही ? हिंदु राष्ट्रात गुलामगिरीची प्रत्येक खूण नष्ट करण्यात येईल ! निजामाच्या वंशजांची दर्पोक्ती कायमस्वरूपी दडपण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादविरोधी पहिला गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा संमत केल्यानंतर बरेली येथे पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंदु तरुणीला विवाहासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्यावरून तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महिलांचा आत्मसन्मान महत्त्वाचा !

लव्ह जिहाद्यांच्या कारस्थानांना हिंदु युवती बळी पडू नयेत, धर्मांतरासाठी दाखवल्या जाणार्‍या आमिषाला बळी पडू नये, याकरता बालपणापासूनच नीतीमूल्यांचे शिक्षण देणे, स्वधर्माविषयी अभिमान वाढेल, असे धर्मशिक्षण देणे, आयुष्यातील कठीण प्रसंगांत स्थिर राहून धर्माची कास धरून वाट काढणे, हेच आता हिंदु समाजाला शिकवायला हवे !

राज्यपालांची संमती मिळाल्याने उत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू

केंद्र सरकारनेच असा कायदा संपूर्ण देशासाठी करण्याची आवश्यकता आहे, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘छळापासून वाचायचे असेल, तर हिंदु तरुणींना बहीण मानावे !’  

धर्मांधांच्या विरोधात कायदा म्हणजे ‘छळ’ असे समजणारे धर्मांध नेते ! धर्मांधांच्या विरोधात कायदा केला, तर त्यांच्यावर वचक बसवता येऊ शकतो, हेच यातून लक्षात येते. तरीही यावर समाधानी न रहाता हिंदूंनी सतर्क राहून हिंदु तरुणींचे रक्षण केले पाहिजे !

वासनांध धर्मांधांचे ढोंग जाणा !

‘लव्ह जिहाद’ एक राजकीय स्टंट आहे. मी मुसलमान तरुणांना आवाहन करतो की, छळापासून वाचायचे असेल, तर त्यांनी हिंदु तरुणींना बहीण मानावे, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन यांनी लव्ह जिहादविरोधी कायद्यापासून वाचण्यासाठी केले.

उत्तरप्रदेश सरकारकडून ‘लव्ह जिहाद’विरोधातील कायद्यासाठी विधी विभागाकडे प्रस्ताव सादर

उत्तरप्रदेश राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात असा कायदा करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – कमल थापा, माजी उपपंतप्रधान  

जगात ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध आदी धर्मियांसाठी अनेक स्वतंत्र देश आहेत; पण भारत आणि नेपाळ या देशांत बहुसंख्य असलेल्या हिंदूंना स्वतःचे असे एकही राष्ट्र नाही. यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

अयोध्येत तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात रामललाची स्थापना

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अयोध्येतील रामजन्मभूमीवर तब्बल २७ वर्षे एका तंबूमध्ये असणार्‍या रामललाला येथून जवळच एका तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात विधीवत् स्थापित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात येथे विधीवत पूजा करून चांदीच्या सिंहासनावर रामललाची स्थापना केली.