उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
योगी आदित्यनाथ यांनी २५ मार्च या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. येथील इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पार पाडला. या वेळी २ उपमुख्यमंत्री, २ महिला मंत्री यांच्यासह एकूण ५२ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.