अयोध्येतील हनुमानगढी येथील महंतांची विटांनी ठेचून हत्या !

  • उत्तरप्रदेशमध्ये साधू, संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्यांचे सत्र चालूच !
  • यावरून अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट आहे, हे दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर उपाययोजना करून साधू, संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांचे रक्षण करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
तपासणी करताना पोलीस

अयोध्या (उत्तरप्रदेश) – प्रसिद्ध हनुमानगढी येथील महंत आणि नागा साधू कन्हैया दास यांची ३ एप्रिलच्या रात्री अज्ञातांनी विटांनी डोके ठेचून हत्या केली. त्यांचा मृतदेह येथील चरणपादुका मंदिराच्या गोशाळेत सापडला. कन्हैया दास बसंतिया पट्टीच्या गुलचमन बाग येथील महंत होते. पोलीस या हत्याचे अन्वेषण करत आहेत. वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

महंत कन्हैया दास यांचे गुरुबंधू रामानुजनदास यांनी सांगितले, ‘महंत कन्हैया दास रात्री जेवणानंतर गोशाळेत झोपले असतांना त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचा भूमी आणि घर यांवरून गोलू दास उपाख्य शशिकांत दास यांच्याशी वाद चालू होता.’ या प्रकरणी पोलिसांनी गोलू दास याला कह्यात घेतले असून त्याची चौकशी चालू आहे.