अलंकापुरीत जमला वैष्णवांचा मेळा; माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज होणार पंढरपूरकडे प्रस्थान !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ११ जून या दिवशी सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान आळंदीतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून छोट्या-मोठ्या दिंड्या अलंकापुरीत आल्या आहेत.

वारकर्‍यांच्या सेवेसाठी पिंपरी पालिकेकडून १२ पथके !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना विविध सेवासुविधा पुरवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १२० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.

वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत आणि श्रद्धा अन् भक्ती यांद्वारे आजही तो वसा चालू ठेवणारे वारकरी !

आज आळंदी (पुणे) येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्या निमित्ताने…

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान !

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने १० जून या दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी ९ जूनपासून शहरात येत होते.

पंढरीची वारी : महाराष्ट्राचे ऐश्वर्य आणि वडिलोपार्जित वारसा !

पंढरीची नित्‍य वारी, गळ्‍यात तुळशीची माळ, संप्रदायाला प्रमाणभूत असलेल्‍या ग्रंथांचे वाचन, पठण, नामस्‍मरण नामसंकीर्तन, विठ्ठल हेच दैवत, सहिष्‍णुता, सदाचार, शाकाहार, व्‍यसनहीनता ही वारकरी पंथाची काही वैशिष्‍ट्ये सांगता येतील.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनी वारी आणि वारकरी यांचा सांगितलेला महिमा !

‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥
पंढरीचे वारकरी । हे अधिकारी मोक्षाचे ॥

माऊलींच्‍या रथाचे अश्‍व ‘हिरा-मोती’चे पुण्‍यात स्‍वागत !

कर्नाटकातील अंकलीहून शितोळे सरकारांच्‍या वाड्यातून ३१ मे या दिवशी प्रस्‍थान झालेल्‍या माऊलींच्‍या दोन्‍ही अश्वांचे ८ जून या दिवशी पुण्‍यात आगमन झाले आहे.

पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणार्‍या वाहनांना पथकर माफ !

पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणार्‍या आणि परतीचा प्रवास करणार्‍या वाहनांचा पथकर माफ करण्‍यात येणार आहे, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वृद्ध भाविकांना दर्शनासाठी विशेष सुविधा करण्‍याची सूचनाही त्‍यांनी पंढरपूर मंदिर प्रशासनाला केली आहे.

रसायनयुक्‍त सांडपाण्‍यातच आळंदी येथे वारकर्‍यांना करावे लागणार तीर्थस्नान !

संतभूमी असलेल्‍या महाराष्‍ट्रात असे होणे, याहून दुसरे दुर्दैव कोणते ? रसायनयुक्‍त सांडपाणी सोडणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे घुसखोरी करू पहाणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे घुसखोरी करू पहाणारे आणि राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रांवर आक्रमणे करणारे दंगलखोर यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेने एका पत्रकाद्वारे केले आहे.