कीर्तन जिहाद ?

‘सबका मालिक एक है ।’ असे म्‍हणत एका धर्मांधाने कीर्तनासाठी जमलेल्‍या भाविकांना ‘ला इलाहा इल्लल्लाह मोहम्‍मद रसूलुल्लाह’ (अल्लाविना दुसरा कुणी भगवान नसून महंमद अल्लाचे पैगंबर आहेत), असे म्‍हणायला लावले आणि तेथे जमलेले हिंदु भाविकही त्‍याचे अनुसरण करत होते. हा ‘व्‍हिडिओ’ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित होत आहे. दुर्दैवाने उपस्‍थितांपैकी एकानेही याचा विरोध करण्‍याचा प्रयत्न केला नाही. याचे कारण म्‍हणजे हिंदु धर्माविषयी असलेले प्रचंड अज्ञान ! याचाच अपलाभ घेऊन भजनाच्‍या माध्‍यमातून सामान्‍य, भोळ्‍याभाबड्या हिंदूंना संभ्रमित करून धर्मपरिवर्तन करण्‍याचे षड्‌यंत्र सध्‍या चालू असल्‍याचे दिसत आहे.

इथे लक्षात घेण्‍याचे सूत्र म्‍हणजे मुसलमान ख्रिस्‍त्‍यांचे आणि ख्रिस्‍ती मुसलमानांचे धर्मांतर करतांना अगदी अपवादानेच दिसतील; पण दोघेही हिंदूंचे मात्र विविध माध्‍यमांतून अतीप्रचंड प्रमाणात धर्मांतर करतात. मुसलमान किंवा ख्रिस्‍ती धर्मांतरासाठी अनेकविध पद्धती, षड्‌यंत्रे अवलंबतात. विविध मार्गांनी हिंदूंना फसवतात, आमिषे दाखवतात आणि हिंदू त्‍यामध्‍ये फसतात. ‘संतांच्‍या विचारांची चुकीच्‍या पद्धतीने, चलाखीने बुद्धीभेद करून मांडणी करत हिंदूंना मुसलमान धर्माकडे आकर्षित करण्‍याचे प्रयत्न’ ही त्‍यांपैकीच एक पद्धत आहे. आतापर्यंत याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मूळ प्रार्थनेत नंतर घुसडलेल्‍या ‘ईश्‍वर अल्ला तेरो नाम…’ या ओळी काय किंवा अनेक हिंदी चित्रपटांतील ‘अल्ला’, ‘मौला’ असे उल्लेख असणारी गीते काय, हा सर्व अन्‍य पंथियांच्‍या श्रद्धास्‍थानांची नावे मोठ्या खुबीने हिंदूंच्‍या गाण्‍यात घालून बहुसंख्‍य हिंदूंच्‍या मनावर त्‍याचा परिणाम करण्‍यासाठीच असते. आता तर हे हिंदूंच्‍या कीर्तनासारख्‍या धार्मिक कार्यक्रमाच्‍या ठिकाणीही धर्मांधता करू लागले, एवढे ‘छुप्‍या धर्मांतरा’चे षड्‌यंत्र राबवण्‍यात ते पुढे गेले आहेत. हे रोखण्‍यासाठी कीर्तनकार, वारकरी आदींनी याला जोरदार विरोध करणे अपेक्षित आहे. हा एक प्रकारचा ‘कीर्तन जिहाद’च आहे, असे म्‍हटले तर चूक ठरणार नाही. कीर्तनकारांनी हा विषय गांभीर्याने घ्‍यायला हवा. सध्‍या काही कीर्तनकारही कीर्तनात अतिरेकी मनोरंजन करणे, त्‍यासाठी विनोद करणे, चित्रपटगीतावर आधारित गाणी म्‍हणणे, असे करतांना दिसतात. अशांना याचे गांभीर्य लक्षात येणेही कठीण आहे. धर्म आणि राष्‍ट्र जागृती हाच कीर्तनाचा उद्देश असतो. तो यशस्‍वी करण्‍यासाठी कीर्तनकारांनी झटायला हवे. ‘कीर्तन जिहाद’ आणि कीर्तनातील अपप्रकार रोखण्‍यासाठी कीर्तनकारांसह श्रोत्‍यांनाही धर्मशिक्षण द्यायला हवे !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे