वारकर्‍यांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा सत्कार !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’ला नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मान्यता देण्यात आली असून आता या योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे,

माघ यात्रेसाठी पंढरपूर येथे अडीच लाखांहून अधिक वारकर्‍यांची उपस्थिती !

२० फेब्रुवारीला झालेल्या माघ यात्रेसाठी पंढरपूर वारकर्‍यांच्या उपस्थितीने भरून गेले असून यात्रेसाठी अडीच लाखांहून अधिक वारकरी उपस्थित आहेत. या वारीसाठी गेल्या २ दिवसांपासून भाविकांनी गर्दी करण्यास प्रारंभ केला होता.

अखिल भाविक वारकरी मंडळाकडून पंढरपूर येथे सोमवारी ठिय्या आणि भजन आंदोलन ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे

अखिल भाविक वारकरी मंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या संदर्भातील लेखी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालय येथे देऊनही वारकर्‍यांना हा त्रास प्रत्येक ३ मासांनंतर होणार्‍या वारीसाठी सहन करावा लागत आहे

वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी  शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले.

श्री. मिलिंद एकबोटे यांना ‘सेवा कृतज्ञता’ पुरस्कार !

‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’त ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रमुख श्री. मिलिंद एकबोटे यांना ‘सेवा कृतज्ञता’ पुरस्कार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्रभु श्रीरामचंद्राविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे बांडगुळ ! – आचार्य प्रल्हाद महाराजशास्त्री

संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव आणि श्रीमलंगगड हरिनाम महोत्सव समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

प्रभु श्रीरामचंद्रांविषयी वादग्रस्त विधान करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करावा !

वाल्मीकि रामायणातील श्लोकाचा चुकीचा अर्थ काढून हिंदुद्वेषी जितेंद्र आव्हाड समस्त हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत.

श्री मलंगगडाच्या पायथ्याशी (कल्याण) कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन

श्री मलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वांत मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २ ते ९ जानेवारी या कालावधीत श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असणार्‍या उसाटणे या गावात हा सोहळा होणार आहे.

देहू (जिल्हा पुणे) येथील गायरान भूमीसाठी वारकरी लढा देतील ! – ह.भ.प. माणिक महाराज मोरे, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज

देहू येथील गायरान भूमी ही देवस्थानाच्या धार्मिक कार्यासाठी वापरली जावी, यासाठी येथील वारकरी उपोषणाला बसले होते. ‘तीर्थक्षेत्र वाचवा आणि गायरान वाचवा’, अशी हाक देऊन हे उपोषण केले होते. मागील २ मासांपासून आम्ही गाव बंद आंदोलन केले, तसेच प्रभात फेरी काढून जनजागृतीही केली.

अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ देवस्थानच्या ४० एकर भूमीची मुसलमानांकडून अनधिकृतपणे वक्फ बोर्डाकडे नोंदणी ! – श्री. ऋषिकेश बांगरे, सचिव, श्री कानिफनाथ ट्रस्ट

धर्मांध मुसलमान आणि त्यांचा वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांची भूमी गिळंकृत करत आहे, याचे हे उदाहरण. या वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !