कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणार्‍या दिंडीमध्ये चारचाकी वाहन घुसून ७ भाविकांना चिरडले !

मृत वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावाचे रहिवासी आहेत. ही दिंडी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पायी पंढरपूरकडे निघाली होती. घायाळ झालेल्या वारकर्‍यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

प्रशासकीय नियोजनशून्यतेमुळे वारकर्‍यांच्या पदरी उपेक्षाच !

आषाढी-कार्तिकी वारीच्या काळात विविध योजनांसाठी, वारकर्‍यांना सुविधा देण्यासाठी, तसेच वर्षभरही कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होतो; मात्र त्याचा वारकर्‍यांना प्रत्यक्ष लाभ किती होतो ?, याविषयी भलेमोठे प्रश्‍नचिन्हच आहे.

कार्तिक वारीच्या काळात वारकर्‍यांना दर्शनासाठी सर्व त्या सुविधा देण्याचा प्रयत्न ! – बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर

कार्तिक वारीच्या काळात मंदिर २४ घंटे वारकर्‍यांना दर्शनासाठी चालू ठेवलेले आहे, तसेच रांगेत असणार्‍या वारकर्‍यांना अल्पाहार आणि चहा देण्याचे आमचे नियोजन आहे. सध्या मुखदर्शन आणि चरणदर्शन घेणार्‍या वारकर्‍यांची संख्या लाखाच्या आसपास आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांच्या संघटित विरोधामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना पदावरून हटवले !

यामुळे वारकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावण असून मंदिरात परत एकदा वारकर्‍यांच्या भजन-कीर्तनाचा आवाज दुमदुमत आहे.

चंद्रभागेसह इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या बैठकीत ठराव !

येथील रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षपदी ह.भ.प. दत्तात्रय महाराज क्षीरसागर होते.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन करण्यास पुन्हा अनुमती !

मंदिर समितीने पुन्हा अनुमती दिली असली, तरी मंदिर समितीतील धर्मद्वेषी अधिकार्‍यांना पुन्हा मंदिर समितीत कार्यरत रहाण्याची अनुमती देण्यात येऊ नये, असेच हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी यांना वाटते !

‘वारकर्‍यांचा जाणता राजा’, असे म्हणत ठाणे येथील वारकर्‍यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार !

येथील वारकरी ह.भ.प. शिवाजी महाराज बुधकर हे हरिद्वार आणि बद्रीनाथ भागात यात्रेला गेले असता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. यात ह.भ.प. बुधकर महाराज आणि त्यांच्या ४ साथीदारांचे निधन झाले.

पंढरपूर वारीतील आरोग्यसेवांचे नियोजन करणे आवश्यक !

वर्षातून दोन वेळा पंढरपूर आद्यपूजेचा मान स्वीकारणार्‍या एका तरी मुख्यमंत्र्याने किंवा सरकारने वारकर्‍यांच्या या समस्या सोडवल्या आहेत का ? वारीतील आरोग्यसेवांचे नियोजन कसे असायला हवे ते पाहूया …

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या परतीच्या पालखीचे पुण्यात स्वागत

हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडून देहू नगरीच्या दिशेने परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे २३ जुलै या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले.

गोपाळकाल्यासाठी गोपाळपूरनगरी वारकर्‍यांच्या गजराने दुमदुमून गेली !

आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. मागील ५ ते ६ दिवसांपासून पंढरपूरमध्ये आलेले भाविक गोपाळकाल्यासाठी उपस्थित होते.