वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या विरोधाचा परिणाम
पंढरपूर – श्री विठ्ठल मंदिरात वारकरी कीर्तन करत असतांना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मंदिरात भजन-कीर्तन बंद करण्यास सांगून ‘यापुढे संत तुकाराम भवन येथेच भजन-कीर्तन करावे’, अशी तोंडी सूचना दिली होती. परिणामी वारकर्यांना चालू असलेले कीर्तन बंद करावे लागले होते. या निर्णयामुळे राज्यभरातील वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ संतप्त झाले अन् त्यांनी मंदिर समितीचा निषेध केला होता, तसेच संबंधित अधिकार्यांचे निलंबन करण्याची मागणी केली होती. त्याच्या परिणामस्वरूप मंदिराच्या प्रशासनाने नमते घेत आज प्रशासनाने असा काही निर्णय न दिल्याचे आणि भजन-कीर्तन करू शकतो, अशा तोंडी सूचना दिल्याचे समजते.
संपादकीय भूमिकामंदिर समितीने पुन्हा अनुमती दिली असली, तरी मंदिर समितीतील धर्मद्वेषी अधिकार्यांना पुन्हा मंदिर समितीत कार्यरत रहाण्याची अनुमती देण्यात येऊ नये, असेच हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी यांना वाटते ! |