पंढरपूरचा विशेष विकास आराखडा सिद्ध करू ! – मुख्यमंत्री

पंढरपूर हे आपल्यासारख्या गोरगरिबांचे दैवत आहे. वारकर्‍यांसाठी स्वच्छ निरोगी वातावरण असायला हवे. त्यासाठी पंढरपूरच्या विकासासाठी एक विशेष विकास आराखडा सिद्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सर्व सुविधांनी युक्त असेल.’’ 

सर्व घटकांतील लोकांच्या जीवनात सुख आणि समृद्धी येण्यासाठी सर्व अडचणी दूर कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

वारीत सहभागी होणार्‍या सर्व वारकर्‍यांना सोयी-सुविधा देण्यात राज्यशासन कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरात सवलतीसाठी प्रवेशपत्र देण्याचे काम चालू !

आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरला जाणार्‍या आणि येणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याबाबतच्या प्रवेशपत्राचे कामकाज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालू आहे.

अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर !

ईश्वराच्या कृपेने महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीमुळे अखंड भक्तीगंगा प्रत्येक वर्षी प्रवाहित होते आणि मनावर भगवंताच्या भक्तीचा संस्कार दृढ होतो. यासाठी समस्त विठ्ठलभक्त संतांच्या चरणी कोटीश: नमन करतात. ‘त्यांच्यासारखी भक्ती आम्हामध्ये निर्माण होऊ दे’, हीच श्री विठ्ठलाच्या चरणी आर्त प्रार्थना !

घायाळ वारकऱ्यांना लागेल ते साहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथून पंढरपूर येथे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत मिरजजवळ बोलेरो गाडी घुसल्यामुळे १७ वारकरी घायाळ झाले आहेत. या घायाळ वारकऱ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे.

आषाढी वारीला जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना पथकर माफी !

वारकर्‍यांनी वाहनांवर ‘स्टिकर्स’ लावण्याच्या, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस यांकडे नोंदणी करण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !

पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदी येथून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ४ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा !

१० जुलै या दिवशी आषाढी एकादशी आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

आषाढी वारीच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेकडून वारकर्‍यांना सुविधा देण्याचे नियोजन !

सोलापूर जिल्ह्यात संतांच्या पालख्या आल्यानंतर वारकर्‍यांना आरोग्यसुविधा देण्यासाठी दीड सहस्र आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी कर्मचार्‍यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

पालखी सोहळ्यात समाजातील सर्वच घटकांनी योगदान देणे आवश्यक ! – अधिवक्ता विकास ढगे पाटील

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाढत चालला असून प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणची जागा आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे वाढीव जागेची मागणी शासनाकडे केली आहे.