श्री गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक काढल्यास कारवाई होणार !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी न करता गर्दी टाळून ते करण्याचे आवाहन पोलीस करत आहेत; मात्र तरीही काही मंडळे विसर्जन मिरवणूक काढत आहेत. हा प्रकार गंभीर असून गणेश विसर्जनाची मिरवणूक काढल्यास कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनासाठी केवळ १० कार्यकर्त्यांनाच अनुमती !

१९ सप्टेंबर या दिवशी असलेल्या अनंतचतुर्दशीनिमित्त असणार्‍या सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी काढण्यात येणार्‍या मिरवणुकांवर बंदी आहे. केवळ १० कार्यकर्त्यांनाच विसर्जनात सहभागी होण्यास पोलिसांनी अनुमती दिली आहे.

पुणे येथील गणेश मंडपातील श्रींचे विसर्जन महापालिकेच्या फिरत्या हौदात करण्याचा पोलीस आयुक्तांचा अशास्त्रीय निर्णय !

मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे मंडपातच विसर्जन होईल. सर्व मंडळे आपल्या मंडपातील हौदात किंवा महापालिकेच्या फिरत्या हौदातच श्रींचे विसर्जन करणार आहेत. नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

शिरसोली (जळगाव) येथे गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी ग्रामपंचायतीने दिलेला कचर्‍याचा ट्रॅक्‍टर गणेशभक्‍तांच्‍या प्रखर विरोधानंतर पालटला !

हिंदूंंच्‍या धर्मभावनांशी खेळणार्‍या ग्रामपंचायतीच्‍या संबंधित व्‍यक्‍तींवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! प्राणप्रतिष्‍ठा केलेल्‍या श्री गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी कचर्‍याचा ट्रॅक्‍टर देण्‍यास  प्रशासन धजावते तरी कसे ?

श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध आणणे, ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी !

केवळ वहात्या पाण्याच्या ठिकाणी गर्दी होते आणि कृत्रिम हौद अन् मूर्तीदान संकलन केंद्र यांठिकाणी गर्दी होत नाही, असे प्रशासनाला म्हणायचे आहे का ?

सर्वोच्च न्यायालयाने शेवटी भाग्यनगर येथील हुसैन सागर तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्याची संमती दिली !

ही अनुमती शेवटची असेल ! – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन बाराही मास पाणी असलेल्या जलस्रोतात करावे !

हिंदु जनजागृती समितीची सोलापूर महापालिकेकडे मागणी

पुणे येथे कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत प्रशासनाकडून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी; मात्र संकलन केंद्रावर तुडुंब गर्दी !

कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत वहात्या पाण्यात विसर्जनास बंदी घालणार्‍या प्रशासनाला संकलन केंद्रांवरील गर्दी दिसत नाही का ?

श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन न करण्याविषयी आणि कागदी लगद्यापासून मूर्ती बनवणार्‍यांवर कारवाई करावी, यांसाठी यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन सादर !

‘अशाप्रकारे श्री गणेशमूर्तींची विटंबना होणार नाही’, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी या वेळी दिले.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये १०० टक्के श्री गणेशमूर्ती विसर्जन !

श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन व्हावे, यांसाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून मूर्ती विसर्जन प्रबोधन मोहीम राबवत आहे.